Tuesday, November 30, 2021

संजय राऊतांना बॉर्नविटा पिण्याची गरज

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत रोज काही ना काही बोलत असतात. बोलून बोलून दमतात. आता त्यांना बोर्नविटा पिण्याची गरज आहे, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील आज कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी मीडियाशी बोलताना ही खोचक टीका केली. संजय राऊत दररोज सकाळी बोलून बोलून दमले, आता नवाब मलिक बोलत आहेत. संजय राऊत आणि मलिक यांच्यामध्येच बोलण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.

संजय राऊत यांना बॉर्नविटा पिण्याची गरज आहे, असा टोला पाटील यांनी राऊत यांना लगावला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानदुखीच्या त्रासावर उपचार करून घेण्यासाठी मुंबईतील रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात भरती झाले आहेत.

त्यावरूनही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला. उद्धव ठाकरे यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही? याचाच अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालय सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होतंय. मला वैयक्तिक टीका करायची नाही. पण देवेंद्र फडणवीस यांना कोरोना

झाल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते, अशी आठवणही पाटील यांनी यावेळी करून दिली.यावेळी त्यांनी मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नवाब मलिक यांना राज्यातील कोणत्याही गावात फिरू देणार नाही. एनआयएनं मलिक यांना तात्काळ

ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे. मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असं सांगतानाच आम्ही चळवळीतील कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कोणत्याही कारवाईला घाबरत नाही, असंही त्यांनी ठणकावलं.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!