Saturday, November 27, 2021

सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचा भाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अनेक जाणकारांनी दसरा आणि दिवाळीच्या आसपास सोन्याचा भाव पुन्हा वधारेल, असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज बहुतांश प्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. कारण, गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.

त्यामुळेच गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडांनी ऑक्टोबरमध्ये 303 कोटींची कमाई केली. सणासुदीच्या काळात  यावर्षी सोन्याची 20 टन अधिक विक्री झाली.सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असतात. अशा परिस्थितीत तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत

असाल तर ही एक चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) डिसेंबरमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.25 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचवेळी, चांदीचे भाव 0.21 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.
ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा

भाव आज 0.25 टक्क्यांनी घसरून 49,091 रुपये प्रतितोळा इतका झाला आहे. दुसरीकडे आजच्या व्यवहारात चांदी 0.21 टक्क्यांनी घसरली. सध्या चांदीचा प्रतिकिलो भाव 66,825 रुपये इतका आहे.

तुम्ही दररोज घरबसल्या सोन्याचा भाव जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुम्ही सोने आणि चांदीचे नवे दर पाहू शकता.

2020 बद्दल बोलायचे झाले तर, गेल्यावर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीने 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज, MCX वर सोने डिसेंबर फ्युचर्स 49,091 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच सोने अजूनही रेकॉर्ड स्तरापेक्षा 7109 रुपयांनी स्वस्त आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!