Wednesday, December 8, 2021

होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवणं गुन्हा नाही – कोर्ट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी पोलीसांकडे येत असतात. अशीच काही प्रकरणं न्यायालयात गेल्यानंतर न्यायालय काही महत्वाची निरीक्षणं नोंदवत असतं. अशाच प्रकरणात मुंबईच्या सत्र न्यायालयाने

एका ३६ वर्षीय आरोपीला तब्बल ११ वर्षांनी निर्दोष मुक्त केलं आहे. लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा या व्यक्तीवर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने एक महत्वाची टीपण्णी केली आहे.

न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना स्पष्ट केलं की, होणाऱ्या पत्नीला काही आक्षेपार्ह मेसेज पाठवणे हे तिच्याशी असभ्य वर्तन होऊ शकत नाही. त्यामुळे जवळपास ११ वर्षांपासून तुरूंगात असलेल्या या व्यक्तीची सुटका होऊ शकली आहे. विवाहपूर्व काळात

एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी अशा पद्धतीचं संभाषण होत असतं असं यावेळी कोर्टाने सांगितलं. लैंगिक भावना जागृत करण्यासाठी आणि त्याबद्दल जाणून घेण्यासाठी अशा पद्धतीचा संवाद दुसऱ्या व्यक्तीला एखाद्यावेळी पटणार नाही,

मात्र याचा अर्थ असा नाही की, ते त्या व्यक्तीशी असभ्य वर्तन आहे.महिलेने २०२० मध्ये तक्रार केली होती. हे जोडपं २००७ मध्ये मॅट्रिमोनिअल साइटवर भेटले होते. घरच्यांचा विरोध असतानाही त्यांनी लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीची आई या

लग्नाच्या विरोधात होती. लग्नानंतर तुम्हाला घरात राहू देणार नाही असं त्याच्या आईने सांगितल्यामुळे २०१० मध्ये त्यांनी संबंध संपवले. दरम्यान, बलात्काराच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने सांगितले की, लग्न करण्याच्या

प्रत्येक वचनाचं पालन न करण्याला फसवणूक किंवा बलात्कार म्हणता येणार नाही.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!