Thursday, December 7, 2023

नगर जिल्ह्यात भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट…

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सत्ताधाऱ्यांवर टीका करणे, हा शरद पवार आणि अजित पवार यांचा अधिकार आहे. २०२४ मध्ये भाजप आणि शिवसेनेचे काम बघून अनेकजण इकडे उड्या मारतील. देवेंद्र फडणवीस

अर्थसंकल्प वाचत असताना विरोधी आमदारांचे चेहरे लहान झाले होते. २०२४-२५ चा अर्थसंकल्प वाचतील तेंव्हा अनेक लोक उड्या मारतील. मात्र कुठले लोक उड्या मारतील हे आज सांगत नाही

असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज शिर्डी दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी बैठक आणि बूथ बैठक पार पडली. तत्पूर्वी बावनकुळे

यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली. या रॅलीत बावनकुळे यांनी खासदार सुजय विखेंना डबलसीट घेत स्वतः मोटारसायकल चालवली. शिर्डीत ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांचं स्वागत केले.

विश्वासघाताच्या राजकारणाला भाजपत थारा नाही. तुम्ही जाहीर सभेत एखाद्या विषयाला घेऊन टिका केली, तर हरकत नाही. आम्ही व्यक्तीगत टिका करत नाही. मात्र आपल्याकडून टिका टिप्पणी होतेय. त्यामुळे आम्ही हात किंवा तोंड बांधलेले नाही. व्यक्तीगत

टिका टिप्पणी तुमच्या ना आमच्यासाठी योग्य आहे. विश्वासघाताचं राजकारण उद्धव ठाकरेंकडून झाले असून भाजपला हे राजकारण पसंत नाही. त्यामुळे भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र येतील का? यावर शंका वाटते.

निवडणूक लढवण्यासाठी कोणतीही डिग्री असण्याचा कायदा नाही. वस्तुस्थीती न स्विकारता केवळ टिका केली जातेय. तुम्ही विकास झाला पाहिजे यासाठी टिका करा. राज्यात आणि देशात अनेक प्रश्न आहेत त्यावर आंदोलन करा. अनेक विषय सरकारपुढे

विरोधकांनी मांडण्याची गरज आहे. मात्र महाराष्ट्र यापासून दूर जातोय. जनतेच्या मनात नकारात्मक विचार पेरले जाताहेत. यातून आपण बाहेर निघायला पाहीजे. विरोधी पक्षाने महाराष्ट्राचे प्रश्न सरकारपुढे मांडायची

गरज असून चुकीच्या गोष्टीवर बोलायला हरकत नाही.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!