Sunday, June 4, 2023

बिअरमध्ये आढळले हे रसायन; समोर आला धक्कादायक अहवाल

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

माय महाराष्ट्र न्यूज:आजकाल बिअर (Beer) पिणे हे कूल असण्याचे लक्षण मानले जाते. तरुणांमध्ये बिअर पिण्याची वेगळीच क्रेझ आहे.

तर तुम्हालाही बिअर प्यायला आवडत असेल तर थोडे सावध राहा. बिअर पिणाऱ्या लोकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. अलीकडेच काही शास्त्रज्ञांना बिअरमध्ये कॅन्सरचे कॅसिनोजेन्स आढळून आले आहेत.

कॅन्सरचा धोका वाढवणारी ही रसायने आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत बिअरसुद्धा तुमच्यासाठी घातक ठरू शकते.युरोपियन हेल्थ एक्सपर्टला त्यांच्या एका प्रयोगात

असे आढळून आले आहे की, कॅन्सरला कारणीभूत रसायने बिअर आणि ट्रिटेड मीटमध्येही असतात. या अर्थाने, शास्त्रज्ञांनी लोकांना बिअर आणि प्रक्रिया केलेले मांस काळजीपूर्वक वापरण्याचा इशारा दिला आहे. विशेषत: तरुणांना

बिअर पिणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, बिअरमध्ये नायट्रोसामाइन्ससारखे (Nitrosamines) घातक रसायन आढळले आहे. यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

नायट्रोसामाइन हे इतके घातक रसायन आहे की त्यामुळे मेंदू, यकृत, किडनी, घसा, फुफ्फुस आणि पोटाचा कर्करोग देखील होऊ शकतो. बिअर किंवा मांसामध्ये नायट्रोसॅमिन मिसळले जात नाही, तर ते नायट्रेट आणि सेकेंडरी अमायन्सच्या प्रतिक्रियेतून

तयार होते, असेही अहवालात सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, बिअर आणि प्रक्रिया केलेले मांस यांचे एकत्र सेवन करणे आरोग्यासाठी अधिक घातक ठरू शकते.शास्त्रज्ञांना क्यूअर्ड मांस, प्रक्रिया केलेले मासे, कोको, बिअर आणि काही

भाज्यांमध्ये नायट्रोसमाइन आढळले आहे. प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये नायट्रेट्स मिसळले जाते जेणेकरून ते जास्त काळ टिकेल. युरोपियन युनियनच्या आरोग्य तज्ञांनी लोकांना संतुलित आणि निरोगी अन्न

खाण्याचा सल्ला दिला आहे ज्यामुळे शरीरातील नायट्रोसॅमिन विषाचा प्रभाव कमी होईल.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!