Tuesday, January 18, 2022

नगर ब्रेकिंग:या पोलीस निरीक्षकांचे तडकाफडकी निलंबित

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कारागृह फोडून आरोपींच्या पलायन प्रकरणी ६ पोलिसांच्या निलंबनाच्या कारवाई नंतर राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या २० दिवसांपूर्वी राहुरी कारागृहाचे मागील बाजुचे खिडकीचे गज कापून मोक्का गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या टोळी प्रमुखासह ५ जण फरार झाले होते. त्यातील तीन आरोपींना पकडण्यात यश आले मात्र २० दिवसानंतर राहुरीच्या पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यातील कारागृहात मोक्का गुन्ह्यात अटक असलेल्या कुख्यात टोळी प्रमुख सागर भांड,किरण आजबे, सोन्याबापू माळी, रवी लोंढे, जालिंदर सगळगिळे आदी आरोपी यांनी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून पलायन केले होते.

दरम्यान राहुरी न्यायालय परिसरात भांड व आजबे यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते तर तिसरा आरोपी सगळगिळे यास मनमाड रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले होते.मात्र सोन्याबापू माळी व रवी लोंढे हे अद्यापही फरार असून पोलीस

त्यांचा शोध घेत असून ते अद्याप सापडलेले नाही. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्या सह सहा पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले होते.बुधवार दिनांक ५ जानेवारी रोजी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके राहुरी पोलीस ठाण्यात

अचानक दाखल होऊन कारागृहाची पाहणी करून राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना निलंबनाची नोटीस बजविण्यात आली.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!