माय महाराष्ट्र न्यूज:एका व्यक्तीने पत्नीचा बदला घेण्यासाठी असं पाऊल उचललं, ज्याबद्दल जाणून तुम्हीही हैराण व्हाल आरोप व्यक्ती कॅब ड्रायव्हर आहे आणि तो HIV पॉझिटिव्ह आहे.
त्याचं 28 वर्षीय पीडित महिलेसोबत 2015 साली लग्न झालं. असा आरोप आहे की या व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत असुरक्षित (विना कंडोम) लैंगिक संबंध ठेवले. आता कर्नाटक पोलीस या HIV पॉझिटिव्ह व्यक्तीचा शोध घेत आहेत.
पीडितेनं आपली HIV टेस्ट केली असून ती रिपोर्टची वाट पाहात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हे कृत्य आपल्या पत्नीकडून बदला घेण्यासाठी केलं, कारण ती त्याच्यासोबतचे संबंध तोडत होती.
पोलिसांनी सांगितलं की आरोपी HIV पॉझिटिव्ह असूनही पीडित महिला त्याच्यासोबत राहाण्यास तयार होती. यादरम्यान दोघांनी एकमेकांसोबत सुरक्षित (कंडोम वापरून) संबंधही ठेवले.
दोघं जवळपास सहा वर्ष एकमेकांसोबत राहिले. यादरम्यान महिला सतत आपली HIV टेस्ट करत असे.पत्नीने इतकी साथ देऊनही आरोपीचे बाहेर अवैध संबंध होते. महिलेला जेव्हा हे समजलं की आरोपी
दुसऱ्याच महिलेला घरी घेऊन आला आहे, तेव्हा ती पतीपासून दूर झाली. यानंतर आरोपी कॅब ड्रायव्हर आपल्या पत्नीला भेटला आणि मागील आठवड्यात बहाना बनवून तिला आपल्या मित्राच्या घरी नेलं.
त्याने महिलेला ड्रग्जचं सेवन करण्यास भाग पाडलं आणि यानंतर तिच्यासोबत असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले.यानंतर महिलेनं मदतीसाठी बसवनगुडी महिला पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला. पोलिसांनी सांगितलं की महिलेला लग्नानंतर हे
समजलं की तिचा पती म्हणजेच आरोपी HIV पॉझिटिव्ह आहे. मात्र यानंतरही आरोपी महिलेला आपल्यासोबतच राहाण्यासाठी तयार करण्यात यशस्वी ठरला. त्याने आपल्या या आजाराचा दोष आपल्या पहिल्या पत्नीवर टाकला होता. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.