माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आत्मचरित्राचा दुसरा भाग ‘लोक माझे सांगाती’, हा आज प्रकाशित झालाय.
या पुस्तकात महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या राजकीय़ घडामोडींबाबत शरद पवार यांनी मनमोकळं केलेलं आहे. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2019 साली
झालेल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या सपथविधीबाबत त्यांनी पहिल्यांदाच सत्य सांगितलं आहे.देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या 2019 झालेल्या शपथविधीची माहिती
सकाळी 6.30 ला आली, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. अजित पवारांसोबत केवळ 10च आमदार होते, असंही शरद पवार यांनी म्हटलय. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांच्या
सहमतीनंच झाला होता, असा गौप्यस्फोट केला होता. त्यावर त्यावेळी पवार काका-पुतण्यांनी मौन बाळगलं होतं. त्याचं उत्तर अखेर शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रातून दिलं आहे. पहाटेच्या शपथविधीची कोणतीही कल्पना आपल्याला नव्हती, असं पवारांनी
आत्मचरित्रात लिहिलं आहे. शरद पवार यांच्याच सहमतीनं हा शपथविधी पार पडतो आहे असं भासवण्यात आल्याचा उल्लेखही या पुस्तकात करण्यात आलाय.पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली नसती, त्यासाठी
या शपथविधीचा उपयोग झाला, असं विधान फडणवीस यांच्या गौप्यस्फोटानंतर शरद पवारांनी पुण्यात दिलं होतं. मात्र हा शपथविधी त्यांच्याच सहमतीनं झाला का, यावर त्यांनी मोनच बाळगलं होतं.
आता अखेरीस या पुस्तकाच्या रुपानं त्यांनी या शपथविधीची कल्पना नव्हती असं स्पष्ट केल्याचं मानण्यात येतंय.शरद पवारांच्या या पुस्तकातील लिखाणाबाबत अजित पवार याांना विचारणा केली असता, पुस्तक
वाचलेलं नाही, ते वाचून प्रतिक्रिया देईन असं उत्तर अजित पवारांनी दिलेलं आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत अनेकदा उल्लेख राजकीय वर्तुळात करण्यात येतो, मात्र यावर अजित पवारांनी कधीही भाष्य केलेलं नाही.
याबाबत फडणवीस आणि आपल्याकडे खरी माहिती आहे, मात्र ती योग्य वेळेस सांगू असं अजित पवार नेहमीच सांगत आलेले आहेत. आता शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकातून याबाबतची भूमिका स्पष्ट केल्यानंतरही अजितदादांनी याबाबत मौनच बाळगणं
पसंत केलेलं दिसतंय. शरद पवार यांच्या आत्मरित्राच्या दुसऱ्या भागात महाविकास आघाडी सरकार निर्माण झाले, त्यावेळी घडलेल्या अनेक राजकीय घडामोडींचा संदर्भ आणि त्यातील पवारांची भूमिका स्पष्ट झालेली आहे.