नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील नागेबाबा परिवार संचलित नागेबाबा अभ्यासिकेतील सहा विद्यार्थ्यांची पोलीस दलात भरती झाली आहे.
भेंडा येथे नागेबाबा मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांचे दूरदृष्टीतून नागेबाबा भक्तनिवास मध्ये नागेबाबा अभ्यासिका सुरू करण्यात आलेली आहे. गरीब-होतकरु विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना यावा यासाठी सुविधा व पुस्तके उपलब्ध करून दिली जातात.
या अभ्यासीकेचा लाभ घेऊन
किरण राजेंद्र अटक,अनिल भाऊसाहेब वायकर,महेश छबुराव गव्हाणे,महेश सोपान रोडगे,अरूण रामनाथ हापसे,कु.विजया राजेंद्र गोल्हार या सहा विद्यार्थ्यांची पोलिस दलात तर निरंजन शहाणे या विद्यार्थ्याची भूमि अभिलेख विभागात निवड झाल्याने त्यांचा नागेबाबा परिवाराचे वतीने सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार जलमित्र सुखदेव फुलारी कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी होते. नागेबाबा परिवाराचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, मास्टर ट्रेन विजय बनकर,अमेरिकेत कार्यरत असलेले इंजी.सागर गायकवाड,गणपतराव गव्हाणे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.यशस्वी विद्यार्थी व प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ज्ञानेश्वर कामगार पतसंस्थेचे मानद सचिव विजय गव्हाणे, अजित रसाळ, सुभाष चौधरी, अशोक गव्हाणे, डॉ. संतोष फुलारी, संजय नवले, अक्षय काळे,
यशवंत मिसाळ,प्रा.सविता नवले,भाऊसाहेब तागड,सुनील गव्हाणे,रंगनाथ गव्हाणे आदि उपस्थित होते.
राजेंद्र चिंधे यांनी प्रास्ताविक केले.
योगिता पटारे यांनी सूत्रसंचालन केले.नागेबाबा संस्थेचे जनरल मॅनेजर अनिल कदम यांनी आभार मानले.