Monday, May 23, 2022

31 मार्चपूर्वी ही 5 कामे कोणत्याही परिस्थितीत करा पूर्ण नाहीतर…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: मार्च महिना अर्धा संपला आहे, आता या महिन्यात फक्त 12 कार्यालयीन दिवस उरले आहेत. याचबरोबर 2021-22 हे आर्थिक वर्षदेखील संपेल. ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवसच नाही तर अनेक आर्थिक कामांची

अंतिम मुदतही आहे. ही आर्थिक कामे वेळेत पूर्ण न झाल्यास पुढील आर्थिक वर्षात अडचणी येऊ शकतात. आपण अशाच काही महत्त्वाच्या कामांबद्दल पाहणार आहोत, जी तुम्ही 31 मार्च 2022 किंवा त्यापूर्वी पूर्ण केली पाहिजेत.

आधार आणि पॅन नंबर लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. तुम्ही अद्याप तसे केले नसेल, तर तुम्ही ३१ मार्चपूर्वी आधार आणि पॅन लिंक करू शकता. असे न केल्यास पॅन क्रमांक अवैध होईल. तुम्ही ई-फायलिंग वेबसाइट किंवा

 UIDPAN 567678 किंवा 56161 वर पाठवून दोन्ही लिंक करू शकता. हे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि UTIITSL च्या पॅन सेवा केंद्रांद्वारे ऑफलाइन देखील जोडले जाऊ शकते.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर, 2020-21 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे आयटीआर भरण्याची अंतिम तारीख अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ ही ठेवली होती. मात्र

जर तुम्ही तोपर्यंत आयटीआर फाइल करू शकला नाही, तर तुम्ही ३१ मार्च २०२२ पर्यंत तुमचे रिटर्न फाइल करू शकता. परंतु विलंबाने आयटी रिटर्न भरताना, करदात्यांना अतिरिक्त कर तसेच दंड भरावा लागेल.

तुम्ही आर्थिक वर्ष 2021-22 साठी जुन्या कर प्रणालीची निवड केली असल्यास, तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत तुमचा कर बचतीची तयारी पूर्ण केल्याची खात्री करा. याचा अर्थ असा की करदात्यांनी सर्व विभागांतर्गत उपलब्ध कपातीचा लाभ घेतला आहे

याची खात्री करावी लागेल. नियमानुसार, सामान्यतः उपलब्ध कर कपातींमध्ये कलम 80C मध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वजावट, NPS योगदानासाठी कलम 80CCD (1B) अंतर्गत 50,000 रुपये कर वजावट, वैद्यकीय विमा प्रीमियमवर 50,000 रुपये कर वजावट इत्यांची समावेश आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. 2021-22 हे चालू आर्थिक वर्ष संपेपर्यंत KYC अपडेट करण्यासाठी कोणतीही कारवाई करू नये, असा सल्ला आरबीआयने

वित्तीय संस्थांना दिला आहे. केवायसी अंतर्गत, बँक ग्राहकांना त्यांचे पॅन कार्ड, पत्ता जसे की आधार, पासपोर्ट इत्यादी अपडेट करण्यास सांगते. यासोबतच अलीकडची छायाचित्रे आणि इतर माहितीही मागवली आहे.

अनेकांचे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) मध्ये खाते असते. तुम्ही चालू आर्थिक वर्षासाठी या खात्यांमध्ये एकही पैसा जमा केला नसेल, तर तुम्ही ३१ मार्च २०२२ पर्यंत

किमान आवश्यकतेसाठीची रक्कम जमा करा. अन्यथा, त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. लक्षात घ्या की 2021-22 या आर्थिक वर्षापासून, एखादी व्यक्ती जुन्या किंवा विद्यमान कर प्रणालीची निवड करू शकते आणि विद्यमान कर सवलत,

कपातीचा लाभ घेऊ शकते. तुम्ही नवीन कर प्रणालीची निवड केली असली तरीही, खाते सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक असलेले किमान योगदान तुम्ही जमा केले आहे याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!