Tuesday, May 17, 2022

महाराष्ट्रातील भाजपाच्या या आमदारांला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजप आमदार गणेश नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. ठाणे सत्र न्यायालायनं गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

लैंगिक शोषण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दीपा चौहान नावाच्या महिलेनं गणेश नाईकांविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान यांनी आरोप करताना म्हटलं की, नाईक यांच्यासोबत असलेल्या संबंधातून मला मुल झालं. त्यानंतर त्यांनी माझ्यावर अनेकवेळा जबरदस्ती केली. गणेश नाईक

यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. जो कोर्टाने फेटाळून लावला आहे.अत्याचार प्रकरणात संशयित आरोपीची वैद्यकीय

तपासणी करणे गरजेचे आहे, त्यामुळे संशयित आरोपीची डीएनए टेस्ट करण्यात यावी अशी मागणी फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयासमोर केली होती. तर डीएनए चाचणी करण्यास नाईक तयार असून

त्यासाठी कस्टडीची गरज नाही असा युक्तिवाद नाईकांच्या वकिलांनी न्यायालयासमोर बुधवारी (27 एप्रिल) केला होता. या गुन्ह्यातील सर्व आरोप निराधार असून महिलेच्या संमतीने संबंध ठेवण्यात

आले होते, म्हणून त्यास बलात्कार मानू नये असा युक्तिवाद नाईकांच्या वकिलांनी न्यायालयात केला. या युक्तिवादावर पीडित महिलेच्या वकिलांनी आक्षेप घेतला. 2010 ते 2017 या काळात नाईक महिलेच्या

इच्छेविरुद्ध त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करीत होते असे पीडितेच्या वकिलांनी न्यायालयासमोर सांगितले.तक्रार मागे घ्यावी यासाठी सध्या फिर्यादीवर दबाव आणला जात असून दोन वेळा नातेवाईकांमार्फत

त्यांना धमकी देण्यात आली आहे, त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. दोन्ही कडील युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणी

गुरुवारी अंतरिम सुनावणी देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. त्यानुसार गुरुवारी (28 एप्रिल) पुन्हा या प्रकरणी न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी दोन्ही कडील वकिलांनी बरेच अतिरिक्त

लेखी युक्तिवाद व अर्ज न्यायालयात सादर केले. त्यामुळे वेळे अभावी ही सुनावणी पुढे ढकलत 30 एप्रिल रोजी अर्जावर निर्णय देण्यार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर शनिवारी ठाणे न्यायालयाचे

न्यायमूर्ती एन. के. ब्रम्हे यांच्यासमोर अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली.’गेल्या 27 वर्षापासून मी गणेश नाईक यांच्या सोबत संबंधात होते. ते नुसते आश्वासन द्यायचे.

मुलगा 5 वर्षाचा झाल्यानंतर मी वडील म्हणून त्याला नाव देईन. परंतू त्यांनी तसं केलं नाही. गणेश नाईक यांनी आर्थिक मदत दिली नाही.’ असा आरोप

ही त्यांनी केला आहे.दुसरीकडे दीपा चौहान या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मोठा अपघात

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भाव स्थिर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला.बाजार समितीत सोमवारी 8855 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला...

आता चॅट आणखी सोपं होणार, WhatsApp च्या नव्या फीचरचं

माय महाराष्ट्र न्यूज:WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवे फीचर्स अपडेट करत असतं. आता पुन्हा एकदा WhatsApp एका नव्या अपडेटवर काम करत आहे. व्हॉट्सअॅपकडून एका नव्या चॅट...
error: Content is protected !!