Thursday, June 30, 2022

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या

सततच्या वाढीनंतर आज बुधवारी सोने वायदे भाव घसरला आहे. परंतु चांदीचा भाव वधारला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने-चांदी दरात घसरण झाली आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा वायदे भाव 82 रुपये कमी होऊन 51,075 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. याआधी MCX वर सोन्याचा भाव

51,109 रुपयांवर ओपन झाला होता. परंतु विक्री वाढल्याने लवकरच 0.16 टक्क्यांच्या घसरणीसह 51000 रुपयांजवळ आला. याआधी मागील अनेक सत्रात सोन्याचा वायदे भाव वाढला होता, परंतु डॉलरमध्ये आलेल्या मजबूतीमुळे सोने दर पुन्हा एकदा घसरला आहे.

चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मल्टीकमॉडिटी एक्सचेंजवर बुधवारी चांदीचा वायदे भाव 10 रुपयांच्या वाढीसह 61,986 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. याआधी हा दर 61,996 रुपयांवर

ओपन झाला होता. परंतु काही वेळात यात घसरण झाली. या घसरणीनंतरही किंमत 0.02 टक्क्यांच्या वाढीसह 62 हजारांच्याजवळ पोहोचला आहे.सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता.

यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!