माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेनेच्या खासदारानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये
अंतर्गत कुरबुरी नेहमीच सुरु असते. या कुरबुरी चित्र नेहमी समोर येत असतं. शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातले नेते आपल्याच मित्रपक्षांवर टीका करताना आपण
नेहमीच बघतो. अशातच शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत इशारा दिला आहे.
हा सर्व प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडला आहे.राज्यात महाविकास आघाडी करण्यात आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे. पवार कुटूंबाला
मोठी परंपरा आहे. त्याची जान राजकारण करताना ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आमदार रोहित पवार यांनी दबाव टाकण्याचे धंदे बंद करावेत.शिवसेना खासदार
गजानन कीर्तिकर सध्या अहमदनगर जिल्हा शिवसंपर्क अभियानासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कर्जत येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे कीर्तिकर यांनी म्हटलं की, आमदार रोहित पवार यांनी आघाडीचा धर्म पाळत मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांना आणि पदाधिकार्यांना विश्वासात घेऊन वाटचाल करावी. जिल्हा नियोजन
समितीच्या निधीमध्ये शिवसेनेला वाटा देण्यात यावा. त्याचप्रमाणे मतदारसंघामध्ये होणार्या विकास कामांमध्ये शिवसैनिकांना सहभागी करून घ्यावे.शिवसेना पदाधिकार्यांनी
ज्या तक्रारी केल्यात, यावरून या ठिकाणी परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आघाडीचा धर्म पाळावा अन्यथा शिवसैनिक ही बांधिल राहणार नाहीत असा इशारा गजानन
कीर्तिकर यांनी दिला आहे. त्यामुळे गजानन कीर्तिकर यांच्या इशाऱ्याला रोहित पवार नेमकं काय उत्तर देतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.