Friday, July 1, 2022

नगर ब्रेकिंग: मोठा अपघात अपघातात दोन ठार एक जखमी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर – औरंगाबाद महामार्गावरील नेवासा तालुक्यातील कांगोणी फाटा शिवारात गुरुवारी राञी १० वाजेच्या सुमारास

पुण्याहून ओरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या क्रेटा कारला समोरुन येणाऱ्या डस्टर कारने हुलकावणी दिल्यामुळे झालेल्या रस्ता अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर

जखमी झाल्याची दुर्देवी घटना कांगोणी शिवारात घडली आहे मृतांमध्ये एक पुरुष आणि एक स्ञी’ चा समावेश आहे तर या अपघातात शिखा मुरलीधर गडपायले (वय ३६) ही महिला गंभीर

जखमी झाली असून तीच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी दवाखाण्यात औषधोपचार सुरु आहे. याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,पुणे येथील पिंपरी सौदागर येथून

आपल्या क्रेटा कार (क्रमांक एम.एच.१४ जे.एक्स ४०२४) हे वाहन औरंगाबादच्या दिशेने जात असतांना समोरुन येणाऱ्या डस्टर कारने हुलकावणी दिल्यामुळे कांगोणी फाटा शिवारात झालेल्या

अपघातात क्रेटा कारमधील परेश मुरलीधर गडपायले (वय३२) रा.पुणे पिंपरी सौदागर,तसेच सोनिका भिमराव आवसरमोल (वय ३२) रा.औरंगाबाद हे या अपघातात जागीच ठार झाले

आहे तर तिसरी महीला शिखा मुरलीधर गडपायले (वय ३६) या झालेल्या अपघातात क्रेटा कारमध्ये अडकल्या होत्या त्यांना जखमी अवस्थेत कारमधून बाहेर काढून त्यांच्यावर औरंगाबाद

येथील एका खासगी दवाखाण्यात औषधोपचार सुरु असल्याची माहीती मृतक सोनिकाचे बंधू डॉ.सचिन अवसरमोल यांनी दिली असून मृतकांचे शवविच्छेदन नेवासा फाटा येथील

ग्रामिण रुग्णालयात करण्याची प्रक्रिया सुरुअसल्याची माहीती वैद्यकिय सुञांनी दिली.या भिषण अपघातातील मृतकांना गाडीतून बाहेर काढण्यासाठी राञीची वेळ असल्याने असपास

मदतीला कोणीही नव्हते जखमी मृतकांना झटपट ग्रामिण रुग्णालयात घेवून आलो माञ जखमी मृत झालेले होते अशी माहीती रुग्णवाहिका चालक गणेश लांडे यांनी यावेळी बोलतांना दिली.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!