Friday, January 21, 2022

राज्यात 24 तासात वाढले इतके रुगण ;जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. कारण, अजुनही रोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत व रूग्णांच्या मृत्यू संख्येत भर पडतच आहे.मागील काही दिवसांमध्ये दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या

ही सातत्याने अधिक आढळून आल्यानंतर, आज करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे झालेल्यांपेक्षा काही जास्त आढळून आली आहे. दिवसभरात राज्यात ४ हजार ३५५ नवीन करोनाबाधित आढळले असून, ४ हजार २४० रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, १९९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत ६२,४३,०३४ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०५ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,३२,६४९ झाली आहे. आतापर्यंत राज्यात १,३६,३५५ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२६,३२,८१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,३२,६४९(१२.२२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,०१,९५५ व्यक्त गृहविलगीकरणात आहेत. तर, २ हजार ३३० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४९ हजार ७५२ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!