Sunday, September 26, 2021

भाजप नेत्यांची जीभ घसरली :राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

 

माय महाराष्ट्र न्यूज: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालागरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही आहे. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष असल्याचा हल्लाबोल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याचा घणाघात दरेकर यांनी केला. पुणे जिल्ह्यातील शिरूर इथं क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.

 

16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा प्रवेश होणार आहे. सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावरुन भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसला टोला लगावला आहे.

भाजपच्या (BJP) एका हातात कुऱ्हाड तर दुसऱ्या हातात कमळ आहे. कुऱ्हाड हि अन्याय अत्याचाराच्या विरोधात उघारली जाते, राज्यात जिथे जिथे महिला अत्याचार होईल तिथे-तिथे हातात कुऱ्हाड घेणार असल्याचं प्रविण दरेकर यांनी यावेळी म्हटलंय

राज्यात होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात भाजपाने कुऱ्हाड हातात घेतली आहे. आता आयऱ्या गयऱ्यांच्या भीतीला घाबरायचे नाही. यांची सत्ता म्हणजे आढवावरचे पाणी, रात्री पण महिती नसतं सकाळी राहिलं का..! तीन पक्ष सरकारमध्ये एकत्र आहेत. मात्र रोज एकमेकांचे कपडे काढायचे काम करतात असा गंभीर आरोप दरेकर यांनी केला आहे.

राज्यात महिलांवर अत्याचार, बलात्कार,विनयभंग होत आहेत. पुण्यनगरीत एक दिवस असा नाही कि बलात्कार अत्याचार होत नाही. राज्यातील या अत्याचार, बलात्काराच्या घटना घडतात या सर्व गोष्टीला सरकारचा नाकार्तेपणा जबाबदार असुन सरकारचा गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश नाही, यांचं प्राधान्य अत्याचाराच्या घटना थांबविण्यासाठी नाही तर सत्ता टिकविण्यासाठी सुरुय असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे.

 

राज्यात सात वर्षापासुन बैलगाडा शर्यतीवर बंद आहे पुढील काळात बैलगाड्यांचे घाट भरतील आणि शर्यतीच्या मागे भाजपा ताकदीने उभी राहिल असा विश्वास प्रविण दरेकरांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!