Sunday, September 26, 2021

ही ‘५’ सूत्रे तुम्हाला बनवतील श्रीमंत; चौथा पर्याय तर जबरदस्त

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आर्थिक सुबत्ता असावी, भरपूर पैसा असावा, श्रीमंत व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी सर्वजण आयुष्यभर भरपूर मेहनतदेखील करतात. मात्र फक्त परिश्रम करून किंवा चांगला पगार असलेली नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्य येणार नाही.

त्यासाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची ठरते. अर्थसाक्षरता म्हणजे आर्थिक बाबींची जाण असली पाहिजे. एरवी आपण पैशांसाठी काम करत असतो मात्र आपण कमावलेल्या पैशाला आपल्यासाठी कामाला लावता आले पाहिजे. अनेकवेळा आपल्या आयुष्यातील काही सवयी किंवा काही समज असे असतात

ज्यामुळे आपणच आपल्या श्रीमंत बनवण्याच्या वाटेवरचे अडथळे ठरत असतो. श्रीमंत होण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि अंमलात आणल्याच पाहिजेत अशा काही टिप्स किंवा सूत्रे पाहूया.

१. तुमचे बजेट आखा : बजेट आखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अखेर तुमचे पैसे कुठे जात आहेत हे बजेट आखल्याशिवाय तुम्हाला कसे कळणार? तुमचा खर्च आणि बचत याचे आकलन तुम्हाला बजेट आखल्यावरच होईल. तुम्ही काही हजार कमवा किंवा लाखो कमवा, बजेट इज मस्ट. बजेट म्हणजेच तुमच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ असतो. यातूनच तुम्हाला तुमच्या नेमक्या आर्थिक क्षमतेची जाणीव होत असते.

२. पुरेसे विमा संरक्षण महत्त्वाचे:आरोग्यविमा आणि आयुर्विमा हे दोन्ही प्रकारचे विमा तुमच्या आर्थिक नियोजनाचा अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. दुर्दैवाने बहुतांश लोक याकडे दुर्लक्ष तरी करतात किंवा पुरेसे विमा संरक्षण तरी घेत नाहीत. तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबियांच्या आर्थिक गरजांची काळजी घेण्यासाठी पुरेसे आयुर्विमा संरक्षण असणे महत्त्वाचे आहे.

योग्य टर्म इन्श्युरन्स घेऊन तुम्ही चिंतामुक्त होऊ शकता. त्यामुळे दुर्दैवाने अकस्मातपणे आलेल्या संकटामुळे तुमच्या कुटुंबाला तुमच्या पश्चात आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार नाही. कोरोना काळात वैद्यकीय खर्चाची तरतूद किती महत्त्वाची असते याची जाणीव सर्वानाच झाली आहे. आरोग्य विमा ती गरज भागवतो.

३. बचत आवश्यक आहे:फक्त कमाई करून उपयोगाची नाही. दरमहा नियमितपणे बचत करणे आवश्यक आहे. स्वत:साठी आधी पैसे बाजूला काढा. म्हणजेच हाती पगार आल्यावर सर्व बिले भरण्याआधी स्वत:च्या बचतीसाठी किमान ५ टक्के रक्कम बाजूला काढा. ही दरमहा केलेली नियमित बचत काही वर्षांनी तुमच्यासाठी मोठी रक्कम उभी करेल. बचतीतून तुमच्या संपत्ती निर्मितीची सुरूवात होते. ही पहिली पायरी असते.

४. दरमहा नियमित गुंतवणूक करा:तुम्ही पैसा साठवून उपयोग नाही. तर पैशाला तुमच्यासाठी कामाला लावले पाहिजे. हे साध्य होते गुंतवणुकीतून. तुम्ही केलेली योग्य आणि नियमित गुंतवणुकच तुमच्यासाठी संपत्ती निर्माण करत असते. दरमहा केलेल्या नियमित बचतीला योग्य गुंतवणूक प्रकारात गुंतवा. कारण गुंतवणुकीमुळे तुमची संपत्ती निर्माण होते.

त्यामुळे विविध गुंतवणूक प्रकारात तुमची गुंतवणूक विभागून ठेवा. दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून नियमित गुंतवणूक करा. यामुळे तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळेल आणि छोट्याशा बचतीतून काही वर्षांनी मोठी रक्कम उभी झालेली असेल.

५. रिटायरमेंट प्लॅनिंग करा: आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे आर्थिक नियोजन कार्यरत असतानाच करा. त्यामुळे तुम्हाला दीर्घकालावधीत योग्य पद्धतीने तजवीज करता येईल. रिटायरमेंटसाठी दरमहा नियमितपणे दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करा. कारण आयुष्यातील विविध जबाबदाऱ्या, दैनंदिन खर्च इत्यादी बाबींमुळे तुमच्या हातातील पैसे खर्च होत राहतात.

पाहता पाहता तुम्ही निवृत्त व्हाल आणि तुमच्या हाती फारसे पैसे राहणार नाहीत. तरुणवयातच रिटायरमेंटसाठी केलेल्या गुंतवणुकीची फळे तुम्हाला निवृत्तीनंतरच्या आयुष्यात चाखता येतील. तरुणपणी केलेले आर्थिक नियोजन तुमचे निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि समृद्ध करेल.

 

 

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!