Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सातबारा मिळणार मोफत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आता त्यांचा ७/१२ उतारा मोफत वाटप करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. उत्तर महाराष्ट्रात ४१, लाख ७८ हजार ३२९ कृषक खातेधारक असून नाशिकच्या विभागीय

आयुक्त कार्यालयाने पहिल्यांदा राज्य शासनासमोर हा विषय मांडला होता. तो शासनाने मान्य केला असून राज्यभरातील शेतकऱ्यांना मोफत सातबारा उतारा वाटपाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते सुरुवात झाली.

पारदर्शकता येणार जमिनीचा सातबारा उतारा हा सामान्य शेतकरी व नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. हाच सातबारा उतारा घेऊन आता शासनाचा महसूल विभाग शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या दारात जाणार आहे. उताऱ्यावर जमिनीची धारणाधिकार पद्धत, एकूण क्षेत्र, गट क्रमांक यासह पोटखराबा आणि इतर

महत्त्वाच्या नोंदी, इतर हक्कातही कर्ज, बोजा, विहिरी यासारख्या नोंदी असतात. राज्य शासनाने उताऱ्याच्या संगणकिकरणाचे काम जवळपास पूर्ण केले असून आता शेतजमिनीबाबत अनेक बाबी ऑनलाईन केलेल्या आहेत.

जिल्हानिहाय सात बारा नगर -१३, ७४,८८२ नाशिक – १०, ५३०९५ जळगांव -१२,१७,५८८ धुळे – ३,१३,२७२ नंदुरबार -२,१९,४९२ विभाग – ४१,७८,३२९ विभागात आज अखेर १ लाख ४६ हजार ९१८ इतक्या सातबारा उताऱ्यांचे मोफत वाटप पूर्ण झाले असून उर्वरित उताऱ्यांचे वाटपही लवकरच पूर्ण होईल.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!