Monday, October 25, 2021

महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून कॉलेज सुरू होणार; जाणून घ्या नियमावली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून कॉलेज आणि शाळा  संपूर्णपणे बंद होते. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी शाळा आणि कॉलेजेस बंद होते. कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तोपर्यंत विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन सुरु आहे.

मात्र आता राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.त्याच पार्श्वभूमीवर आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कॉलेज सुरु करण्याबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

शाळांनंतर आता येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व महाविद्यालयं   सुरु करण्यात येणार आहेत अशी माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषद  घेत दिली आहे.

नियम :५० टक्के व त्यापेक्षा जास्त क्षमतेने महाविद्यालये सुरू करण्याबाबत विद्यापीठाने निर्णय घ्यावा. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यानुसार नियम तयार करावे. महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले पाहिजे.

डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयाने पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबिर आयोजित करावे, त्याबाबात सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या परिसरात कोरोना अजूनही आहे त्याठिकाणी स्थानिक पातळीवरून महाविद्यालये सुरू करायचे की नाही याबाबत निर्णय घ्यावा.

विद्यापीठाने जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नियमावली जाहीर करावी. प्रत्येक ठिकाणी कुठली नियमावली लागू करावी, हे विद्यापीठाने ठरवावे. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही. त्यांच्यासाठी महाविद्यालयाने

ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.वसतीगृहांच्या संबंधित मोठा प्रश्न आहे. टप्प्याने वसतिगृह सुरू केले जाते. मात्र, वसतिगृहे सुरू करण्यापूर्वी त्याचा आढावा घ्यायचा आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि महाविद्यालयातील कर्मचारी त्यांचे शंभर टक्के लसीकरण झाले पाहजे.

त्याचा अहवाल शासनाला पाठवावा. दोन डोस ज्यांना घेतले आहेत त्यांनी महाविद्यालय परिसरात येताना कोरोना नियमांचे पालन करावे. ज्यांचे डोस पूर्ण झाले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी दुसरा डोस घेऊन महाविद्यालयात लवकर यावे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!