Friday, October 22, 2021

नगर विधान परिषद निवडणुकीच्या हालचाली सुरु;या दोन पक्षांत लढत रंगणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: विधान परिषदेच्या अहमदनगरसह राज्यातील 8 विधान परिषद आमदारांची मुदत 15 डिसेंबरला संपत आहे. नगरची जागा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची असून यात महापालिका व नगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती मतदार असतात.

राज्य सरकारने राज्यातील अहमदनगरसह आठ मतदारसंघांतील मतदारांची माहिती मागविली आहे. निवडणूक कार्यालयांनी महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी यांना पात्र मतदारांची माहिती कळवा, असे सांगितलेले आहे.

जिल्ह्यातील एकूण मतदारांपैकी किती मतदार पात्र ठरतात याकडे लक्ष आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघात दोन टर्मपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ.अरूणकाका जगताप हे प्रतिनिधीत्त्व करीत आहे. आता राज्यात महाविकास आघाडी असून राष्ट्रवादीच नगरची जागा लढविण्याची शक्यता आहे.

अशावेळी भाजपकडून या जागेवर कोणाला उमेदवारी मिळते याचीही चर्चा सुरु झाली आहे.दरम्यान विधान परिषदेची निवडणूक जशी जवळ येत आहे. तसेच आता जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाऊगर्दी झालेली दिसून येत आहेत.

त्यातच बाहेरील पक्षातून राष्ट्रवादीत येऊन विधान परिषदेसाठी एक-दोन नेते तयार आहेत. या इच्छुकांच्या गर्दीत मात्र सर्वसामान्य कार्यकर्तेंंनी माजी आमदार चंद्रशेखर घुलेंनी यांनाच पक्षाने उमेदवारी देऊन त्यांच्या पदरात एकनिष्ठेचे फळ टाकावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

विधान परिषदेची निवडणुकीला अवधी असला तरी सध्या कोण निवडणुकीला उभे राहिल, याची चर्चा सध्या सुरु झालेली आहे. काहींनी तर मताची आकडेवारी जुळवाजुळव सुरु केलेली आहे. त्यासंदर्भात काहींनी जिल्ह्यातीलच नेत्यांबरोबर प्राथमिक चर्चा केलेली असल्याचेही कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून सध्या विद्यमान आमदार अरुण जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, ज्येष्ठ नेते प्रताप ढाकणे, माजी आमदार राहुल जगताप यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु झालेली आहे. परंतु या नावांमध्ये सर्वात वरच्यास्थानी दादाभाऊ कळमकर यांचे नाव चर्चेत आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!