Friday, December 3, 2021

नगरमध्ये महादेव जानकर म्हणाले, भाजपने आमच्याशी गद्दारी केली….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा व पदाधिकारी आढावा बैठक काल गुरुवारी अहमदनगर येथे झाली. जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जानकर पुढे म्हणाले, भाजप हे जिंतूर व दौंडची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देणार होते. मात्र, त्यांनी त्या जागा आम्हाला दिल्या नाहीत. याचा जाब आता भाजपच्या नेत्यांना विचारला पाहिजे. मित्रानेच आमच्याशी गद्दारी केली, आमची मान कापली. ‘भाजप’ने आमचा विश्वासघातच केला आहे, यावर मी ठाम आहे, अशी टीका जानकरांनी केली.

देशामध्ये आज पाच राष्ट्रीय पक्ष आहेत. आम्हालासुद्धा राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली पाहिजे, या उद्देशाने आम्ही आता इतर राज्यांमध्ये निवडणूक लढवत आहोत. येणाऱ्या उत्तरप्रदेश निवडणुकीतही लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जानकर म्हणाले, पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज आहेत, असे मला वाटत नाही. जर बहिणीला सासुरवास होत असेल, तर ती निश्चितच माहेरी सांगत असते. त्या जेव्हा माझ्या कानात सांगतील, त्यावेळेला मी त्यांना योग्य तो सल्ला देईल असेही जानकर यांनी सांगितले.

ईडी व इतर संस्थांचा केंद्राकडून होत असलेल्या वापरा बाबत महादेव जानकर म्हणाले, ज्याला कर नाही, त्याला डर कशाला? पाहिजे. काँग्रेसनेही सत्तेचा वापर अशाच पद्धतीने केला होता, तसाच वापर आता भाजप करत आहे, असे ते म्हणाले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!