Thursday, January 20, 2022

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:निलेश राणे यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. निलेश राणे यांनी दिवंगत नेते मनोहर परीकर यांचा एक फोटो ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर परीकर मुख्यमंत्री असताना त्यांचे निधन झाले.

पण 1 दिवससुद्धा घरी बसले नाही. कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी झुंजत असताना त्यांनी कधी कामामध्ये तडजोड केली नाही, शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात. अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तब्येतीच्या कारणास्तव पूर्णवेळ अधिवेशनाला उपस्थित नाहीत. त्यावरून भाजप नेते मुख्यमंत्र्यांवर आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत आहेत.

दरम्यान गुरूवारी अधिवेशावेळी विधानसभेबाहेर आंदोलन करत असताना आदित्य ठाकरे तिथे येताच नितेश राणे यांनी म्याऊ, म्याऊच्या घोषणा द्यायला सुरूवात केली, शिवसेनेच्या वाघाचे मांजर झाल्याची टीकाही त्यांनी केली, त्यानतंर त्यावरून बराच वाद पेटल्याचे दिसून आले.

यावेळी नितेश राणे यांनी मी आणखी आक्रमकतेने सरकारवर तुटून पडणार असल्याचेही सांगितले आणि त्यांच्या या ट्विटमधूनही तेच दिसून येत आहे. विविध मुद्द्यांवरून भाजप सध्या महाविकास आघाडी सरकारला घेरण्याच प्रयत्न करत आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!