Tuesday, November 30, 2021

पत्रकार दातीर हत्या प्रकरणाचा तपास या खमक्या अधिकाऱ्याकडे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे नाव आल्यापासून प्रमुख विरोधी पक्ष भाजपा या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.

जिल्ह्यातीलमाजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, राम शिंदे यांनी दातीर कुटुंबियांची भेट घेवून त्यांना दिलासा देवून या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीसही दातीर कुटुंबीयांना भेटणार आहेत.

या पार्श्वभूमीवर दातीर हत्या प्रकरणाचा तपास डी.वाय.एस.पी संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहे.
राहुरी येथील पत्रकार श्री रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडने अचानक आलेल्या एका

पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे मारले होते. त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला उी.पे.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत, राहुरी व तोफिक मुक्तार शेख वय 21 वर्ष रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.

तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह अन्य एक जण फरार होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास डी.वाय.एस.पी संदीप मिटके श्रीरामपुर यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!