माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे आज दुपारी निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती.
कोविडची लागण झाल्याने त्यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, नुकतेच त्यांना घरी पाठविण्यात आले होते. शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची अगदी सुरवातीपासून महत्वाची भूमिका होती.
सुधीर जोशी यांच्यावर उद्या सकाळी शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव त्यांच्या शिवाजी पार्कातील पारिजात निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
‘संस्कृत व सुशिक्षित कार्यकर्त्यांचे मोहोळ लाभलेला’ आणि लोभस असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. मुंबईचे माजी महापौर तरुण व तडफदार सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज
असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी सोपविली, ती त्यांनी समर्थपणे सांभाळली.