Saturday, July 2, 2022

नगर जिल्ह्यात अजित पवारांनी दिला भाजपला मोठा धक्का;काही पधाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज नेमकं काय सुरू आहे?, याकडेही

सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत. अजित पवारांनी आज मंत्रालयात विविध बैठका घेतल्या. याशिवाय एक राजकीय कार्यक्रमही त्यांच्या उपस्थितीत झाला. अहमदनगर जिल्ह्यातील

भाजपच्या काही पधाधिकाऱ्यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम पूर्वनियोजित असला तरी सध्याच्या राजकीय घडामोडीत लक्षवेधक ठरला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील व मधुकर पिचड यांच्या काही समर्थकांना राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गळाला लावले होते. त्यांचा लवकरच पक्षप्रवेश

होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पूर्वीच दिली होती. तो योग नेमका आज जुळून आला. अहमदनगर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य

बाळासाहेब हराळ, अकोले तालुक्यातील कैलास वाकचौंरे व वसंतराव मनकर यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकीकडे भाजपकडून विधान परिषदेच्या निकालानंतरचा

जल्लोष सुरू आहे. नगर जिल्ह्यातून प्रा. राम शिंदे हेही विजयी झाले आहेत.अशातच नगरच्या या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी

नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार राहुल जगताप, घनःश्याम शेलार, सीताराम गायकर, अशोक भांगरे, कपिल पवार,

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके उपस्थित होते. भाजपचे ज्येष्ठ नेते विखे पाटील आणि मधुकर पिचड यांचे हे कार्यकर्ते असल्याने त्या दोघांनाही हा धक्का मानला जात आहे.

आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षात आलेल्या या नव्या पदाधिकाऱ्यांना काय संधी मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!