Thursday, August 11, 2022

अन्वय पवार याची टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये एमएससाठी निवड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

भेंडा येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता पब्लिक स्कुलचा माजी विद्यार्थी अन्वय महेंद्र पवार याची टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटी (यूएसए) मध्ये औद्योगिक अभियांत्रिकी मधील एमएस पदवीउत्तर शिक्षणासाठी निवड झाली आहे.

अन्वय पवार याने भेंडा येथील जिजामाता पब्लिक स्कुलमध्ये प्राथमीक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले तर पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी (बी.ई.) संपादन केलेली आहे.
त्याला पुढील पदवीउत्तर एमएस शिक्षणासाठी यूएसए मधील टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळाला आहे.

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तांत्रिक सल्लागार महेंद्र पवार व जिजामाता माध्यमिक-उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका डॉ.जयश्री पवार यांचा अन्वय मुलगा आहे.

या यशाबद्दल श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था व ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते अन्वयचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,विश्वस्त माजी पांडुरंग अभंग,अड.देसाई देशमुख,काशिनाथ नवले, काकासाहेब नरवडे,काकासाहेब शिंदे, प्रा.नारायण म्हस्के,पंडितराव भोसले,अशोकराव मिसाळ, बबनराव भुसारी,दादासाहेब गंडाळ,भाऊसाहेब कांगुणे, जनार्धन कदम,शिवाजी कोलते,मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी,सखाराम लव्हाळे,दीपक नन्नवरे,शंकरराव पावसे,विष्णू जगदाळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी,आप्पासाहेब खरड,एम.एस.मुरकुटे,एस.डी चौधरी,महेंद्र पवार, मुख्य अभियंता राहुल पाटील, शेतकी अधिकारी सुरेश आहेर,प्रशासकीय अधिकारी के.एन.गायके,कार्यालयीन अधीक्षक नामदेव पुंड,जनसंपर्क अधिकारी कल्याण म्हस्के,विलास लोखंडे, स्थापत्य अभियंता सुधाकर ढाकणे, दत्तात्रय चिमणे,अशोक मते,कल्याण जांभूळकर,विरसेन पवार, पब्लिक स्कुलचे प्राचार्य सोमनाथ औताडे,उपप्राचार्य दीपक राऊत , दीपक टेकणे आदी उपस्थित होते.
प्रारंभी कामगार संचालक सुखदेव फुलारी यांनी प्रास्ताविक करून माहिती दिली.

 

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!