Wednesday, August 17, 2022

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून घोलपच उमेदवार ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डीतून शिवसेनेचा उमेदवार मी किंवा माझा मुलगा योगेश असेल. एवढे मात्र नक्की, की उमेदवार

घोलपच असेल, अशा शब्दांत आज माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उमेदवारीबाबत भूमिका मांडली. या विधानाने त्यांच्याविरोधात प्रलंबित असलेल्या न्यायालयीन निवाड्यामुळे त्यांच्या

शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारीबाबत निर्माण झालेली साशंकता दूर केली. संपर्कप्रमुख या नात्याने आज (मंगळवारी) त्यांनी येथे येऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेनेने येथील विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची वाट धरताच, या मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी घोलप यांची नियुक्ती केली. युवा नेते

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात घोलप यांच्या उमेदवारीचे संकेत देण्यात आले. मात्र, घोलप यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारींबाबतचा न्यायालयीन निकाल येणे बाकी आहे.

न्यायनिवाडा झाल्यानंतरच त्यांना येथून उमेदवारी करण्याचा मार्ग मोकळा होईल.तोपर्यंत ते उमेदवारीबाबतचा दावा करू शकत नाहीत, असा आक्षेप त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन लढा देणारे मुंबईचे मिलिंद

यवतकर यांनी घेतला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर घोलप यांनी, येथून मी किंवा माझा मुलगा योगेश, म्हणजे घोलपच उमेदवार असेल हे नक्की, अशी सुधारित घोषणा केली.२०१४ च्या

लोकसभेची उमेदवारीदेखील दिली होती. त्यांनी प्रचाराची पहिली फेरीदेखील पूर्ण केली होती, मात्र न्यायालयीन निवाड्याच्या आधारे त्यांना ऐन वेळी उमेदवारी मागे घेण्याची वेळ आली.

अवघ्या सतरा दिवसांत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे खासदार झाले. तथापि, अद्यापही हा न्यायालयीन निकाल येणे बाकी आहे. शिवसेना स्वबळावर लढणारमाजी मंत्री बबनराव घोलप

यांनी, उत्तरेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल, अशी घोषणा करून शिवसैनिकांत चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. येत्या २७ ते ३० ऑगस्ट

या कालावधीत ते शिवसैनिकांचे तालुकावार मेळावे घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू करणार आहेत.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!