Friday, October 22, 2021

सर्वात मोठी बातमी: शरद पवार हे विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार? सुत्रांची माहिती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज : निवडणूक रननीतीकार प्रशांत किशोर यांनी काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी  ही उपस्थित होत्या. प्रशांत किशोर यांची गांधी कुटुंबियासोबत एक बैठक झाली.

दरम्यान आता या बैठकीसंदर्भातील एक नवीन बातमी समोर आली आहे.या बैठकीत राज्यातील निवडणुकाच नव्हे तर आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांवरही चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावेळी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर जोर असल्याचं समजतंय.

महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी दोन वेळा शरद पवारांची भेट घेतली होती. मंगळवारी किशोर यांनी राजधानी दिल्लीतील खासदार निवासस्थानी सोनिया गांधी , राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा यांची भेट घेतली. ही भेट पंजाब कॉंग्रेस किंवा आगामी विधानसभा निवडणुकांमधील सुरू असलेला कलह दूर करण्यासाठी करण्यात आली होती.

असं सुरुवातीला बोललं जात होतं. दरम्यान कॉंग्रेसनं 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून त्यासाठी ही बैठक केल्याचंही म्हटलं जात होतं.2017 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत कॉंग्रेस अपयशी ठरल्यानंतर पाच वर्षांनी राहुल गांधी आणि किशोर यांची भेट झाली. त्यावेळी

समाजवादी पक्षाबरोबर युती करुन यूपी विधानसभा निवडणूक लढविणारी कॉंग्रेस अपयशी ठरली होती आणि पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले.

ताज्या बातम्या

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...
error: Content is protected !!