Monday, October 25, 2021

गडगंज लोकांना जाळ्यात ओढणाऱ्या नगर जिल्ह्यातील त्या महिलेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:प्रेमाच्या जाळ्यात ओढून, अश्लील चित्रफितीच्या आधारे खंडणी उकळणाऱ्या महिलेसह तिघांना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. या महिलेने अनेक पुरुषांना याच पद्धतीने जाळ्यात ओढल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. काही पुरुषांवर अत्याचाराचे गुन्हेही दाखल केले गेले आहेत.

या प्रकरणात काही पीडित पुरुष पुढे येऊ लागले आहेत. दुसऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकविणारी ‘शिकारी’ महिलाच दोन साथीदारांसह कायद्याच्या जाळ्यात अडकून शिकार झाली आहे. अश्लील चित्रफीत काढून, त्याआधारे खंडणी उकळत होती .संगमनेर शहरातील एका उच्चभ्रू परिसरात संबंधित महिला एका बंगल्यात राहत होती.

फेसबुक, व्हॉट्‍सॲपद्वारे ती प्रोफाइल (संबंधिताची व्यक्तिगत माहिती) तपासून पाहत होती. श्रीमंत व्यक्‍ती असल्यास त्याच्याशी फेसबुक आणि व्हॉट्‍सॲपच्या माध्यमातून संपर्क साधून प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे. घरी बोलावून दोन साथीदारांच्या मदतीने अश्लील चित्रफीत काढून, त्याआधारे खंडणी उकळत होती.

संगमनेर तालुक्‍यातही एक गुन्हा संबंधित महिलेविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात खंडणीचा एक गुन्हा दाखल आहे. या महिलेनेही काही व्यक्‍तींवर अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहेत. या महिलेने फसविल्याची आणखी काही प्रकरणे पुढे येण्याची शक्‍यता आहे. पोलिसांशी संपर्क साधा नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता पुढे यावे.

शरीरसुखाचे आमिष दाखवून अश्लील चित्रफीत तयार करीत धमकी देत कोणी पैशांची मागणी करीत असेल, तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!