Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांचे मोठे विधान तर लोकसभा निवडणूकही लढविण्यास तयार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आधी पारनेर तालुक्यातील काही नेते मला विरोधक मानून टीका करीत होते. आता माझ्या कामामुळे जिल्ह्यातील काही जणांना मी विरोधक वाटू लागल्याने तेही टीका करू लागले आहेत. त्यांच्या टीकेकडे मी फारसे लक्ष देत नाही. मात्र, वेळ आल्यास लोकसभेची निवडणूकही आपण सक्षमपणे लढण्यास तयार आहोत

अशा शब्दांत पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी नगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांना आव्हान दिले आहे. पारनेर तालुक्यातील पळशी येथील एका कार्यक्रमात बोलताना लंके यांनी हे आव्हान दिले.लंके म्हणाले, ‘माझ्याकडे कोणत्याही संस्था नाहीत. कारखाने नाहीत, हॉस्पिटल नाहीत. माझ्याकडे आहे ती जीवाभावाची माणसे. तशी माणसे मात्र कोणाकडे नाहीत.

त्यामुळे कोणी कितीही टीका केली तरीही मी घाबरत नाही. आधी तालुक्यातील काही जण मला स्पर्धक मानून टीका करीत होते. आता जिल्ह्यातील लोकही स्पर्धक मानू लागले आहेत. त्यामुळे मी डगमगणार नाही. मात्र, वेळ पडली तर लोकसभा निवडणूकही सक्षमपणे लढविण्यास आपण तयार आहोत. फक्त बोलणारे खूप असतात. संतांनाही त्रास झाला होता, मी तर साधा माणूस आहे. मात्र आपण जीवाला घाबरत नाही.

त्यामुळेच कोविड सेंटरच्या माध्यमातून लोकांची सेवा करू शकलो. आज जे माझ्यावर आणि कोविड सेंटरवर टीका करीत आहेत, त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांनाही आमच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेण्याची वेळ आली. विळद घाटातील त्यांच्या संस्थेत नोकरीला असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली. तेव्हा तेथील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करून घेताना अनामत रक्कम मागितली गेली.

त्यामुळे ते आमच्या सेंटरला आले आणि मोफत उपचार घेऊन गेले, असे लंके यांनी सांगितले.आमच्या कोविड सेंटरवर टीका करणाऱ्यांनी येथील काम पहावे. आतापर्यंत या कोविड सेंटरमधून सुमारे १७ हजार रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. खासगी हॉस्पिटलच्या दरांच्या तुलनेत हिशोब काढायचा झाला तर सुमारे १८५ कोटी रुपयांचे हे काम झाले आहे. लोकांचा एवढा पैसा वाचला आहे. काहींनी दिल्लीहून विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शन आणल्याचे सांगितले, मात्र त्यांनी ती कोठे वाटली.

त्या काळात रेमडेसिवीरचा काळाबाजार कसा झाला, त्याचे केंद्र कोणते होते, लाभार्थी कोण होते, याची जर चौकशी केली तर अनेक जण अडचणीत येतील असे लंके म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!