Monday, October 25, 2021

या बँकेत 6500 पदांची मेगा भरती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. SBI ने 6,100 ॲप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी SBI ने अर्ज मागविले आहेत. उमेदवार SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 6 जुलैपासून सुरू झाली आहे.

तर 26 जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येईल. या पदांसाठी ऑगस्टमध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल.ॲप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान पदवीधर असणं आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे असावे.

या पदासाठी मासिक वेतन 15,000 रुपये आहे. ऑनलाईन अर्ज केल्यावर उमेदवाराला फी देखील भरावी लागेल. त्याशिवाय अर्जाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. सर्वसाधारण (General), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) कॅटेगरीतील (Category) उमेदवारांसाठी परीक्षा फी 300 रुपये आहे. तसेच एससी (SC) / एसटी (ST) आणि दिव्यांग (PWD) उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेण्यात येत नाही.

लेखी परीक्षा एकूण 100 गुणांची असेल. ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातील. परीक्षेमध्ये सामान्य आर्थिक ज्ञान, सामान्य इंग्रजी, क्वांटिटेटिव ॲप्टिट्युड (Quantitative Aptitude) आणि रिझनिंग एबिलिटी (Reasoning Ability) आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्युड (Computer Attitude) या चार विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. चारही विषयांसाठी प्रत्येकी 25-25 प्रश्न विचारले जातील.

कॅटेगरीनुसार पदं
आरक्षणाच्या नियमांनुसार एकूण 6,100 पदे वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. ज्यामध्ये 2577 सर्वसाधारण, 604 ईडब्ल्यूएस, 1375 ओबीसी, 977 एससी आणि 567 जागा एसटीसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.तुम्हीही या परीक्षेसाठी अर्ज करू शकता. बँकेच्या वेबसाइटवर (Bank Website) जाऊन याबद्दलचं परिपत्रक (Notification)

पूर्ण वाचा आणि त्यानुसार 26 जुलैपूर्वी अर्ज करा. या परीक्षेत आणि पुढच्या प्रक्रियेत यश मिळालं तर सरकारी नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळेल.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...
error: Content is protected !!