Sunday, December 4, 2022

जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठाणचे समाजरत्न पुरस्कार जाहीर

WhatsApp Image 2022-08-26 at 5.05.26 PM
WhatsApp Image 2022-11-25 at 7.45.24 AM
previous arrow
next arrow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथिल जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने मातोश्री स्व.सौ.द्वारकाबाई मारूतराव मोहिटे पाटील यांचे स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या सन २०२२ चे “समाजरत्न पुरस्कार” जाहीर करण्यात आल्याची माहीती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव मोहिटे यांनी दिली.

समाजात विविध क्षेत्रात दिशादर्शक व समाजोपयोगी कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जाणता राजा प्रतिष्ठाणच्या वतीने मातोश्री स्व.सौ द्वारकाबाई मारूतराव मोहिटे यांचे स्मरनार्थ “समाजरत्न”पुरस्कार देण्यात येतात.या वर्षी सन२०२२ च्या पुरस्कारासाठी निवड समितीने विविध क्षेत्रातील ११ नावांची घोषणा केली आहे.

यामध्ये जेष्ठ वैद्य डॉ.जगन्नाथ नरवडे (आरोग्य सेवा), पत्रकार अशोक पेहरकर व सौ.रंजना पेहरकर (आदर्श माता-पिता),भेंडा खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षका
व राज्य कबड्डी पंच श्रीमती मनिषा धानापुणे(क्रिडा क्षेत्र),कुमार गर्जे (कृषी क्षेत्र),कैलास शिंदे (कृषी उद्यजक), काळे वस्ती शाळा उपक्रमशिल शिक्षिका श्रीमती नीता आनंदकर (शिक्षण क्षेत्र), भानसहिवरे केंद्र शाळा श्रीमती वर्षा शेटे-ठाणगे(शिक्षण क्षेत्र),उर्दु शाळा सलाबतपुरचे शिक्षक फयाज शेख (शिक्षण क्षेत्र),डॉ. शिवाजी सोनवणे (पशुआरोग्य सेवा),महावितरण चे उप कार्यकारी अभियंता शरद चेचर (लोकसेवा क्षेत्र), भायगव येथील पत्रकार शहाराम आगळे (पत्रकारीता) आदिंचा समावेश करण्यात आला आहे.
या पुरस्कारांचे वितरण लवकरच प्रमुख मान्यवरांचे हस्ते होणार असल्याची माहीती प्रतिष्ठाणच्या वतीने लक्ष्मणराव मोहिटे यांचेसह मानव साळवे,आरिफ शेख,चांगदेव दारुंटे यांनी दिली आहे.

- Advertisement -

ताज्या बातम्या

error: Content is protected !!