Monday, October 25, 2021

लग्नाला नकार दिल्यानं तरुणीचं घृणास्पद कृत्य; प्रियकराला लॉजवर बोलवलं अन्…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुण्याजवळील चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित प्रियकरानं लग्नाला नकार दिल्यानं प्रेयसीनं सूड उगवला आहे. आरोपी प्रेयसीनं प्रियकराला चिंचवड परिसरातील एका लॉजवर बोलवून कायमचा विषय संपवला आहे.

रात्री दहाच्या सुमारास लॉजमधील रुममध्ये मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी तरुणीला गजाआड केलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पैगंबर गुलाब मुजावर

असं हत्या झालेल्या विवाहित प्रियकराचं नाव आहे. मृत पैगंबर आणि आरोपी तरुणी एकाच ठिकाणी कामाला होते. त्यामुळे दोघांत अनेकदा बोलणं व्हायचं. यातूनच वर्षभरापूर्वी पैगंबर याचं आरोपी तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. काहीकाळ त्याचं नातं व्यवस्थित चालल्यानंतर मृत पैगंबर आरोपी तरुणीला भेटायला जात नव्हता.

दरम्यान तिने पैंगबरकडे लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे मृत पैंगबरनं लग्नाला नकार दिला.हा राग मनात धरून आरोपी प्रेयसीनं पैंगबरच्या हत्येचा कट रचला. दोन दिवसांपूर्वी प्रेयसीनं पैगंबरला चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरातील व्हाईट हाऊस लॉजमध्ये भेटायला बोलावलं. पैगंबरही नेहमीप्रमाणे तिला लॉजवर भेटायला गेला.

पण आरोपी तरुणीचा इरादा मात्र वेगळाच होता. पैगंबर लॉजमध्ये आल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी तरुणीनं अचानक पैगंबरच्या गळ्याभोवती ओढणीचा फास टाकला आणि तो घट्ट आवळला. यातच पैगंबरचा मृत्यू झाला.

यानंतर रात्री दहाच्या सुमारास तिने पैगंबर बेशुद्ध पडल्याचं लॉजमधील कर्मचाऱ्यांना सांगितलं. लॉजमधील कर्मचाऱ्यांनी पैगंबरला तातडीने पुण्यातील वायसीएम रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

या प्रकरणी पोलिसांनी 29 वर्षीय आरोपी प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!