Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांची घडी विस्कटली होती. आकाशाकडे टक लावून बघणार्‍या बळीराजाची चिंता वाढली होती. खरिपाची पिके सुकू लागली होती. गेल्या चार सहा दिवसांपासून नभ दाटून यायचे, पाऊस कोसळेल अशी अपेक्षा शेतकर्‍यांना असताना पाऊस सातत्याने हुलकावणी देत होता.

मात्र सोमवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पावसाच्या मध्यम सरींनी एक तास हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.दरम्यान आज मंगळवारी नेवासा राहता, श्रीरामपूर ,राहुरी काही भागात पावसाने सकाळपासूनच सुरुवात केली आहे अनेक भागात चांगल्या प्रकारे पाऊस पडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटले आहे.

मान्सूच्या सुरूवातीला काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. नंतर पावसाचा लपंडाव सुरू झाला. जून महिन्याच्या अखेरीस पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी खरीप पिकांची पेर केली. कशी बशी पिके बहरू लागली आणि पुन्हा पावसाने दडी मारली. मोठ्या् अडचणीतून बी-बियाणे , औषधे खरेदी करून शेतकर्‍यांनी धाडस केले.

कष्ट आणि खर्च वाया जाईल, अशी परिस्थीती निर्माण झाली. ज्यांच्याकडे पाण्याची मुबलकता होती त्यांनी तुषार सिंचनाद्वारे पिके जगवण्यासाठी धडपड केली.परंतु पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली पिके धोक्यात आली.गेल्या चार-सहा दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत होता. सोमवारी सायंकाळी काळे नभ दाटून आले.

पावसाची चाहूल लागताच रस्त्यावर दुकाने थाटलेल्या शहरातील व्यापार्‍यांनी दुकानाची आवराआवर केली. बघता बघता पावसाने सुरूवातीला अर्धातास दमदार बॅटींग केली तर मध्यम स्वरूपाचा पाऊस अर्धा तास पडत होता. कालच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली. या पावसाने दिलासा मिळाला असला

तरी पिकांना जीवदान मिळण्यासाठी संततधार पावसाची गरज आहे. पिकांना जीवदान मिळाले तरी उत्पादन क्षमतेत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!