Friday, October 22, 2021

अजित पवार म्हणतात तुझ्यासाठी एवढ्या लवकर आलोय कमी वयात खूप मोठा कार्यक्रम घेतला आहेस व्यवस्थित जबाबदारी पार पाड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज राहुल कोळसे :महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बारामती तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा कु. भाग्यश्री धायगुडे यांनी पुणे ते बारामती भव्य रिले (१११ किलोमीटर) रनचे आयोजन केले होते.

अजितद पवार यांचे पुणे येथील निवासस्थान जिजाई बंगला येथुन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सकाळी झेंडा दाखवून रिले रनचे उदघाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवती जिल्हाध्यक्षा पूजा बुट्टे उपस्थित होत्या.

पुणे ते बारामती रिले रनचा सांगता समारंभ राष्ट्रवादी भवन कसबा, बारामती येथे टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी होळकर उपस्थित होते. यावेळी बारामती नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माळेगाव कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे,

वैशाली नागवडे,बन्सी आटोळे,जयसिंग देशमुख,प्रशांत काटे, सचिन सातव, मदननाना देवकाते,येळे सर,शिवाजी टेंगले,रोहीत कोकरे,राहुल वाबळे,आरती शेंडगे,संजय सोनवणे,कोच अजित लोणकर इत्यादी उपस्थित होते. सांगता समारंभ प्रसंगी तालुका युवती अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रावहिनीसाहेब यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन

आम्ही नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असतो. ग्रामीण भागातील तरुणांना स्पर्धेमध्ये भाग घेणे कामी प्रोत्साहन मिळणे करिता युवा नेते पार्थदादा पवार यांचे वारंवार मार्गदर्शन असते यातूनच या स्पर्धेचे आयोजन केले.भारताने जी ६ ऑलिंपिक पदक आणली ही आपल्या भारतीयांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

या रिले रन मधून ग्रामीण भागातील मुलांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे आणि यातून नककी चांगले खेळाडू तयार होतील असा माझा विश्वास आहे. केकेबी रनर्स ग्रुपच्या मुलांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचे खूप कौतुक वाटते.पुणे ते बारामती दरम्यान रिले रन होत

असताना सर्व गावो गावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व मित्र परिवाराने रिले रन स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या केकेबी रनर्स ग्रुपचे स्वागत केले व त्यांचे मनोबल वाढवले याबद्दल आणि पोलीस प्रशासनाचे देखील भाग्यश्री धायगुडे यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!