Monday, October 25, 2021

मैत्रिणीवर जीव जडला, पण तिनेच घात केला, हनीट्रॅपमध्ये अडकवत….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सोशल मीडियावर झालेली ओळख ही अंगलट आल्याच्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात. पनवेल येथील एका तरुण बांधकाम व्यावसायिकालाही सोशल मीडियावर एका तरुणीशी झालेली ओळख चांगलीच अंगलट आली आहे.

सोशल मीडियावर ओळख झालेल्या या तरुणीने बांधकाम व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवलं. त्यानंतर त्याच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी या तरुणीसह सहा जणांच्या टोळीला अटक केली आहे.

केवळ नववी पास असलेली ही तरुणी सोशल मीडियाचा वापर करण्यात चांगलीच पटाईत आहे. तिचा पती खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगतोय. पती कारागृहात गेल्यावर पतीच्या गुन्हेगार मित्रासोबत तिची ओळख झाली अन् यातूनच हनीट्रॅप करणाऱ्या नव्या टोळीचा उदय झाला. अनेकजण त्यांचे सावज सुद्धा झाले. कोणी अब्रूला घाबरुन तर कोणी भीतीपोटी त्यांना पैसे देत पोलिसात जाण्याचे टाळले.

तक्रारीनंतर अवघ्या 72 तासात बेड्या

मात्र चार दिवसांपूर्वी मुंबईच्या एका व्यवसायिकाने पोलिसात जाण्याचे धाडस केले. अन् अवघ्या 72 तासांच्या आत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे आणि त्यांच्या पथकाने संपूर्ण हनीट्रॅप करणारी ही टोळी गजाआड केली. या टोळीने पनवेल येथील 31 वर्षीय व्यवसायिकाला मारहाण करत खंडणी उकळली होती. या घटनेंतर व्यावसायिकाने पोलिसात धाव घेतली होती.

याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या टोळीला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रविंद्र भगवान बदर (वय 26), सचिन भातुलकर, आण्णा साळुंके (वय 40), अमोल ढवळे (वय 32), मंथन शिवाजी पवार (वय 24) आणि 19 वर्षीय तरुणी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!