Wednesday, October 27, 2021

पीएम किसान: लाभार्थी नसूनही फायदा मिळवणाऱ्यांना सरकारचा दणका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा नववा हप्ता जारी करण्यात आला आहे. दरम्यान 9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचली आहे. सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे थेट पाठवले आहेत. मात्र अद्यापही काही शेतकरी असे आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

शिवाय असेही काही आहेत जे अपात्र असून त्यांना 2000 रुपये खात्यात जमा झाले आहेत. या शेतकऱ्यांना लाभार्थी नसूनही या योजनेचा लाभ घेतला आहे. ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने पीएम किसान योजनेचा फायदा उचलला आहे, त्यांच्याकडून हे पैसे वसूल करण्याचं काम सरकारने सुरू केलं आहे. अनेक राज्य सरकारांनी अशा लोकांना रिकव्हरी नोटीस जारी करून वसूली सुरू केली आहे.

बनावट आधार कार्ड देऊन या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या 3.86 लाख आहे. तर करदाते असूनही योजनेचा लाभ मिळवणाऱ्यांची संख्या 2.34 लाख आहे. शिवाय 32 हजार मृत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000  रुपयांची रक्कम जमा झाली आहे. अशाप्रकारे विविध कारणांमुळे देशभरात 42 लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे सरकारला एकूण 2900 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

कुठे जमा करावी लागेल रक्कम?
अनेक राज्यात पती-पत्नी दोघांना फायदा, मृत शेतकरी, चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर, बनावट आधार, करदाते-पेन्शनधारकांना फायदा इ. प्रकरणं समोर आली आहेत. या अपात्र शेतकऱ्यांकडून त्यांना पाठवण्यात आलेली रक्कम वसूल करण्याचे काम सुरू आहे.

अपात्र शेतकऱ्यांना कृषी उपसंचालक कार्यालयात ही रोख रक्कम जमा करावी लागेल. रक्कम जमा केल्यावर त्यांना एक पावती दिली जाईल. नंतर, विभाग सरकारच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाईल आणि अपात्र शेतकऱ्याचा डेटा ऑनलाइन पोर्टलवरुन हटवण्यात येईल.

या शेतकऱ्यांकडून परत घेतली जाईल PM Kisan ची रक्कम
-PM Kisan चा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:ची जमीन असणं आवश्यक आहे. तुम्ही दुसऱ्याची जमीन भाड्याने घेऊन कसत असाल तरी या योजनेचा लाभ मिळणार नाही.

जर शेतजमीन वडील किंवा आजोबांच्या नावावर असेल तरी या योजनेचा फायदा घेता येणार नाही. अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असेल तर त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!