Monday, October 18, 2021

नगर जिल्ह्यातील या दत्त देवस्थानची बँकखाती गोठवली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरातील प्रसिद्ध अशा सावेडी दत्त मंदिराच्या दत्त देवस्थान ट्रस्टची सर्व खाती संबंधित बँकांनी गोठवली आहेत. त्यात ट्रस्टचे ८६ कोटी अडकले आहेत. त्यामुळे ट्रस्टच्या व्यवस्थापनाला ह्या बँकांच्या माध्यमातून कोणतेही आर्थिक व्यवहार करणे अशक्य झाले आहे.

त्यामुळे ट्रस्टवर आर्थिक विवंचना करण्याची वेळ आली आहे. ट्रस्टतर्फे या बाबत भक्तांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, अशी माहिती एक भक्त मोहन ब्रह्मे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ट्रस्टचा कारभार वादात
सावेडीच्या प्रसिद्ध दत्त देवस्थानच्या ट्रस्टचा कारभार नेहमीच वादात राहिला आहे. या देवस्थानात दरवर्षी राज्यभरातून भक्त येत असतात. ट्रस्टकडे असलेला सर्व पैसा या भक्तांनी दिलेल्या देणग्या आहेत. ज्यांच्यामुळे हे देवस्थान राज्यात प्रसिद्ध आहे, त्या रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी सुरू केलेले उपक्रम आता बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. याचे मुख्य कारण ट्रस्टचा कारभार असल्याचा आरोप भक्त करत आहेत.

ब्रह्मे म्हणाले, की अनेक भाविकांनी या ट्रस्टवर अधिकार नसलेल्या व्यक्ती ट्रस्टचा कारभार चालवत असल्याच्या तक्रारी अनेक भक्तांनी धर्मादाय आयुक्तांकडे केल्या आहेत. या तक्रारींची धर्मादाय उपायुक्त व आयुक्तांनी दखल घेतलेली नाही. त्यामुळे आम्ही ही कैफियत मांडत आहोत. या तथाकथित ट्रस्टच्या कारभाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भाविकांवर दरोड्याचे गुन्हे
या आधी ट्रस्टकडे काही माहिती मागितली, तर त्यांच्या विरोधात चक्क दरोड्यासारखे गंभीर व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. नंतर पोलिस तपासात ते खोटे असल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी तसा अहवालही न्यायालयात सादर केला आहे. ज्यांच्या जीवावर देवस्थान चालते, त्या भक्तांवर अशा प्रकारचे

गुन्हे दाखल करण्याचे धाडस ट्रस्टचे विश्वस्त कसे करू शकतात, असा भक्तांचा सवाल आहे. ट्रस्टच्या विश्वस्तांबद्दल भक्तांमध्ये अतिशय दहशतीचे वातावरण आहे. धर्मादाय आयुक्तही सध्याच्या तथाकथित विश्वस्त मंडळाला पाठिशी घालत असल्याचा आरोप भक्त करत आहेत.

बँक व्यवस्थापकाची ट्रस्टशी बांधिलकी:
बँकांनी ट्रस्टची खाती गोठवण्याचं कारण सध्याच्या ट्रस्टचा कारभारच कारणीभूत आहे. कारण ट्रस्टशी अजिबात संबंध नसलेल्या व पेशाने वकील असलेली व्यक्ती सर्व कारभार करत असल्याने व त्याच्या सह्या करण्याच्या अधिकारात गडबड आढळल्याने बँकांनी ट्रस्टची खाती गोठवली आहेत. विशेष म्हणजे, या

बाबत एका बँकेच्या व्यवस्थापकाकडे भक्तांनी माहिती मागितल्यानंतर ती मेलवर देताना संबंधित व्यवस्थापकाने ट्रस्टच्या त्या वादग्रस्त सचिवालाही सीसीत ठेवले आहे. बँकेच्या व्यवस्थापकाची ट्रस्टशी संबंधित व्यक्तीबरोबरची बांधिलकी संशय निर्माण करणारी आहे, असे ब्रह्मे यांनी सांगितले

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!