Monday, October 18, 2021

लस घेतल्यानं नपुंसकत्व येतं का? भाजपा आमदार म्हणतो  मी तीन चार महिने चेक केलं पण….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात करोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरु झाली आणि लसीकरणाबाबत अनेक गैरसमज पसरण्यास सुरुवात झाली. बरेच लोक या गैरसमजांमुळे लस घेण्यास टाळाटाळही करत आहेत. त्यापैकीच एक गैरसमज म्हणजे लस घेतल्याने नपुंसकत्व येतं.

हा गैरसमज दूर करण्यासाठी मध्यप्रदेशातल्या एका भाजपा नेत्याने एक अजबच विधान केलं आहे.मध्यप्रदेशातल्या कटनी इथला एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये माजी राज्यमंत्री आणि भाजपा आमदार संजय पाठक हे लोकांना अजब उदाहरण देत लस घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

करोनापासून वाचायचं असेल तर लस हा एकच उपाय आहे, असं सांगत असतानाच त्यांनी नपुंसकत्वाबद्दलचा गैरसमजही दूर केला आहे.संजय पाठक म्हणतात की, जेव्हा मी लस घेऊन आलो आणि मी ह्या गोष्टीविषयी ऐकलं तेव्हा मलाही फार चिंता वाटली होती. पण मी तीन चार महिने चेक केलं पण काहीच झालं नाही.

त्यामुळे तुम्हीसुद्धा चिंता करू नका आणि कोणाचं काही ऐकू नका. काहीही झालं तरी लसीकरण करणं गरजेचंच आहे.संजय पाठक यांचं म्हणणं योग्य होतं. मात्र त्यांनी हे सांगण्यासाठी जे उदाहरण दिलं आहे, त्यामुळे ते आता चर्चेचा विषय ठरत आहेत. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून आता

 हा विषय थट्टामस्करीचा झाला आहे. त्याचबरोबर जेव्हा पाठक मंचावर बोलत होते, त्यावेळी उपस्थितांच्या हसण्याचा आवाजही येत आहे. थोडक्यात काय, गंभीरतेने लक्ष देण्याचा विषय पाठक यांच्या उदाहरणामुळे थट्टेचा विषय ठरला.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!