Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यातील धरणं भरेनात; चिंता वाढली ; जाणून घ्या जिल्ह्यातील सर्व धरणातील पाणीसाठा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सध्या राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. नगर शहरातही मंगळवारी रात्री चांगला पाऊस पडला. नगर शहरात जिल्ह्यात सर्वाधिक ४६ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. आजही अधूनमधून सरी पडतच आहेत.

पण, जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यांची जीवनवाहिनी असलेल्या भंडारदरा, मुळा व इतर धरणांमध्ये पाण्याची अत्यंत अल्प आवक सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस असल्यानं ही स्थिती उद्भवली आहे. धरणे न भरल्यास अत्यंत भीषण परिस्थिती उद्भवण्याची भीती आहे.

ऑगस्टनंतर राज्यात परतीचा पाऊस सुरू होतो. त्यावेळी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात फारसा पाऊस नसतो. त्यामुळे धरणं भरण्यासाठी हाच महिना उरला आहे. यंदा अद्याप नाशिक जिल्ह्यातील धरणेही भरलेली नाहीत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे गोदावरीतून फारसं पाणी वाहिलेलं नाही.
गेल्या वर्षी होतं भरपूर पाणी

गेल्या वर्षी या काळात भंडारदरा धरण भरून मुळा धरणही ८० टक्क्यांहून अधिक भरलं होतं. शिवाय धरणांतून जायकवाडीसाठी पाणीही सोडण्यात आलं होतं. यंदा मात्र स्थिती चिंताजनक आहे. या दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या १५ दिवसांपासून पावसाचा जोर खूप कमी झाला आहे. त्यामुळे धरणांतील पाण्याची आवक मंदावली आहे.

धरणांच्या पाणलोट क्षेत्राबरोबरच लाभक्षेत्रातही पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. धरणांत कमी पाणीसाठ्याबरोबरच पाणलोट क्षेत्रात प्रामुख्यानं भाताच पीक घेतलं जातं. त्यालाही पाणी कमी पडल्यानं पीकं पिवळी पडू लागली आहेत.

१५ दिवसांत स्थिती जैसे थे:
भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८ ऑगस्ट रोजी ९७७९ दशलक्ष घनफूट होता. दहा दिवसांनंतर म्हणजे आज तो फक्त ९७३५ दशलक्ष घनफूट आहे. धरणातून १२३१ क्युसेकने पाणी सोडण्यात आलं आहे. भंडारदरा धरणात गेल्या २४ तासांत फक्त ६० दशलक्ष घनफूट नवीन पाणी आलं आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील हरिश्चंद्र गड परिसरातही पावसाचा जोर ओसरला आहे.

त्यामुळे कोतूळजवळ मुळा नदीचा विसर्ग आज सकाळी फक्त ८१३ क्युसेक होता. २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या मुळा धरणात आता १७ हजार ९१२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मुळा धरण ६८.८९ टक्के भरले आहे. मुळा धरणात गेल्या २४ तासांत फक्त ६८ दशलक्ष घनफूट पाणी आले आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर येथे बुधवारी सकाळी २२, रतनवाडी येथे ९, तर पांजरे येथे अवघा ८ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. भंडारदरा धरण परिसरात ६ मिलिमीटर, तर मुळा धरणाच्या परिसरात १८ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे.

निळवंडे धरण ६६ टक्के पाणीसाठा:
सध्या भंडारदरा धरणातून १२३० क्युसेकनं सोडण्यात आलेलं पाणी निळवंडे धरणात जमा होत आहे. त्यामुळे या धरणाचा पाणीसाठी ६६ टक्क्यांवर पोचला आहे. याही भागात पाऊस कमीच आहे. निळवंडे धरणात ५४८४ दशलक्ष घनफुट (६५.९१ टक्के) पाणीसाठा झाला आहे.

आढळा धरणात ४९.२४ टक्के पाणीसाठा:
आढळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाला अजिबात जोर नाही. धरणाच्या परिसरात काल अजिबात पाऊस नोंदवला गेला नाही. सध्या धरणात १५ दिसांपूर्वी असलेलाच ४९.२४ टक्के पाणीसाठा आहे.

सीना धरणात :४४.१३ टक्के पाणी
विशेष म्हणजे, यंदा सीना धरणात ऑगस्टच्या सुरवातीसच ४५.३३ टक्के पाणीसाठा होता. त्यात घट होऊन सध्या धरणात ४४.१३ टक्के पाणीसाठा आहे.

 *जायकवाडीत ५५.६४ टक्के पाणीसाठा*
मराठवाड्यातील महत्त्वाच्या व मोठ्या असलेल्या धरणात सध्या ५५.६४ टक्के पाणीसाठा आहे. त्यातील ४०.५६ टक्के साठा उपयुक्त आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!