Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यातील या मार्केटमध्ये कांदा भावात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल बुधवारी कांद्याच्या भावात सोमवारच्या तुलनेत 200 रुपयांनी वाढ झाली. काल जास्तीत जास्त 2200 रुपयांपर्यंत भाव निघाले. 67 हजार 525 गोण्या (38 हजार 475 क्विंटल) इतकी आवक झाली.

मोठ्या मालाला 1850 ते 1900 रुपयांचा भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाल 1650 ते 1700 रुपये, मध्यम मालाला 1600 ते 1650 रुपये, गोल्टा/गोल्टी कांद्याला 900 ते 1600 रुपये तर जोड कांद्याला 400 ते 500 रुपये भाव मिळाला. तीन-चार वक्कलांना 2100 ते 2200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

दरम्यान पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांदा बाजारासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. या बाजार समितीत खरेदी केलेला कांदा थेट मुंबई, बेंगलोर व दिल्लीसह देशातील विविध राज्यात व मोठ्या शहरातही पाठविला जातो. आज बाजार समितीत फक्त नऊ हजार कांदा गोण्याची आवक झाली. तर प्रथम क्रमांकाच्या कांद्यास फक्त 20 रूपये प्रति किलो.

म्हणजे दोन हजार रूपये क्विंटल प्रमाणे बाजार भाव मिळाला. तालुक्यात अद्यापही मोठ्या प्रमाणात जुना कांदा शिल्लक आहे. तसेच नवीन कांदाही बाजारात येऊ लागला आहे. मात्र यंदा पाऊस अतिशय कमी प्रमाणात तर काही भागात झालाच नसल्याने नवीन कांद्याचे उत्पादन अतिशय कमी आहे.

त्यामुळे नवीन कांदा बाजारात फारसा येणार नाही. ही शक्यात शेतकऱ्यांनी गृहीत धरली आहे. भविष्यात कांद्याचा तुटवडा निर्माण होईल अन् बाजारभाव वाढतील या अशेवर शेतकऱ्यांनी आपला कांदा साठवून ठेवला आहे. अनेकदा ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढतात.

त्यामुळे शेतकरी साठवलेला कांदा बाजारभाव वाढल्याशिवाय बाजारात आणत नाहीत. मात्र यंदा कांदा आवक कमी होऊनही बाजारभाव वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!