Wednesday, October 27, 2021

उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करत आहेत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईत आज जनआशिर्वाद यात्रा निघाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचं दर्शन घेण्यापूर्वी नारायण राणे यांची जाहीर सभा झाली. या सभेत नारायण राणे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीकेचा बाण सोडला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजपचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळी देखील नारायण राणेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते. भाषणाच्या सुरुवातीलाच नारायण राणे यांनी भाजपचे आभार मानले.

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी ऋणी आहे, असे म्हणत नारायण राणे यांनी आपल्या भाषाणाची सुरुवात केली. त्यानंतर ठाकरे सरकारवर टीकाचा बाण सोडला.

महाराष्ट्रातील जनता आताच्या सरकारला कंटाळलेली आहे. हे सरकार राज्यातील कुठल्याही समस्येचा विचार करु शकत नाही. उद्धव ठाकरे आपल्या नावाप्रमाणे राज्याला उध्वस्त करत आहेत. जनता राज्यातील सरकारला कंटाळली आहे. त्यामुळेच आशेचा किरण म्हणून राज्यात भाजपाची सत्ता यावी अशी अपेक्षा ठेऊन आहे.

त्यामुळेच यात्रेला उपस्थिती दिसत आहे, असा टीकेचा बाण नारायण राणे यांनी जनआशिर्वाद यात्रेत सोडला.शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आजपासून राणेंची जनआशीर्वाद यात्राकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!