Wednesday, October 27, 2021

घरासाठी बँकेकडून लोन घ्यायचा विचार करताय, तर ‘या’ दोन बँका देतायत आकर्षक ऑफर्स

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला परवडणाऱ्या दरात कर्ज घेण्याची उत्तम संधी आहे. पंजाब नॅशनल बँकेने स्वातंत्र्य दिनाच्या निमीत्ताने गृहकर्जाच्या ऑफर दिल्या आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत या ऑफरचा लाभ घेता येईल.

पीएनबीच्या स्वातंत्र्य दिनाच्या गृहकर्जाच्या ऑफर अंतर्गत ग्राहकांकडून कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारणार नाहीत. म्हणजेच गृहकर्ज कोणत्याही प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवजीकरण शुल्काशिवाय उपलब्ध असेल. पीएनबी ग्राहकांना 6.80 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. म्हणजेच PNB कडून गृहकर्ज घेणाऱ्यांना कमी दरात गृहकर्ज मिळेल.

तसेच दोन्ही शुल्कही माफ केले जातील. पीएनबीने याबद्दल ट्विट केले आहे.  पीएनबी सुवर्ण कमाईची संधी देखील देत आहे. आपल्याकडे निष्क्रिय पडलेले सोन्याचे दागिने, आपण त्याच्या मदतीने कमावू शकता.सुवर्ण मुद्रीकरण योजने अंतर्गत किमान 10 ग्रॅम सोने जमा करता येते. बँक ठेवीसाठी तीन पर्याय देत आहे.

 अल्प मुदतीच्या ठेवी 1-3 वर्षांच्या असतील. मध्यम मुदतीच्या ठेवी 5-7 वर्षांच्या असतील आणि दीर्घ मुदतीच्या ठेवी 12-15 वर्षांच्या असतील. अल्प मुदतीच्या ठेवींमध्ये 1 वर्षासाठी 0.50 टक्के, 1-2 वर्षांसाठी 0.60 टक्के आणि 2-3 वर्षांसाठी 0.75 टक्के व्याज उपलब्ध असेल.

 मध्यम मुदत ठेवींसाठी व्याज दर 2.25%आहे, तर दीर्घ मुदतीच्या ठेवींसाठी हा व्याज दर 2.50 टक्के आहे.एसबीआयने (SBI) यापूर्वी किरकोळ ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या ऑफर आणल्या होत्या.  एसबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, ते आपल्या ऑटो लोन ग्राहकांकडून प्रोसेसिंग फी आकारणार नाही आणि कार कर्जासाठी ऑन रोड 90 टक्के अर्थसहाय्य देखील

करेल. एवढेच नाही तर जे ग्राहक बँकेच्या YONO अॅपद्वारे कार कर्जासाठी अर्ज करतात त्यांना व्याजदरांमध्ये 25 बेसिस पॉइंटची विशेष सवलत देखील मिळेल.  एसबीआयचे म्हणणे आहे की YONO वापरकर्त्यांना 7.5% व्याज दराने कार कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

याशिवाय, ज्या ग्राहकांना सुवर्ण कर्ज घ्यायचे आहे, त्यांना 7.5% व्याज दराने 75 बेसिस पॉईंट्स (0.75%) सूट मिळेल. ग्राहकांनी YONO अॅपद्वारे सुवर्ण कर्जासाठी अर्ज केल्यास त्यांच्यासाठी प्रक्रिया शुल्क देखील माफ केले जाईल. एसबीआय आपल्या ग्राहकांना गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्कापासूनही दिलासा देत आहे. बँकेने जाहीर केले आहे की त्याच्या

गृहकर्ज ग्राहकांना 31 ऑगस्ट 2021 पर्यंत प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही, एसबीआयचे गृहकर्जाचे व्याज दर 6.7% वार्षिक पासून सुरू होतात.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!