Monday, October 25, 2021

नगरमध्ये कोरोना सुरू असतानाच या आजाराच्या प्रादुर्भाव वाढण्याच्या भिती ;सापडले इतके रूगण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :वातावरण बदलल्यामुळे शहरात थंडी-ताप व डेंग्यूसदृष रूग्णांमध्ये मोठी वाढ होत असून, कोरोना सुरू असतानाच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्याच्या भितीने सर्वसामान्य नागरिक हवालदील झाले आहे. शहरात आतापर्यंत पाच डेंग्यूचे रूग्ण आढळले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून व्हायरल आजाराचे प्रमाण वाढले आहे. कोरोना सुरू असतानाच या आजाराने डोके वर काढल्याने नागरिक हवालदील झाले आहेत. विशेषतः लहान मुलांना या आजाराची लागण जास्त प्रमाणात होत आहे. तसेच कोरोना होऊन गेलेल्यांना ताप, थंडी, अंग ठणकणे याची लक्षणे दिसू लागली आहेत.

काही वैद्यकीय व्यावसायिकांनी हा प्रकार म्हणजे ‘पोस्ट कोरोना’ असल्याचे म्हटल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. वास्तविक दरवर्षी व्हायरल आजाराचे प्रमाण मोठे असतेच. डेंग्यू, चिकन गुणिया, थंडीताप हा आजार दरवर्षी या दिवसात पसरतो. पावसाचे पाणी अडगळीच्या वस्तूंमध्ये साचत असल्याने तसेच स्वच्छतेबाबतही अनेक प्रश्न व त्यात वातावरणाची भर पडल्याने या आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे.

महापालिकेनेही असे आजार वाढण्याची शक्यता अगोदरच व्यक्त केली होती. तसे पत्र वैद्यकीय व्यावसायिकांना दिले होते. डेंग्यू सदृष रूग्ण आढळल्यानंतर त्याची माहिती महापालिकेला देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहरात 22 रूग्ण डेंग्यू सदृष असल्याचे समोर आले. त्यांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आले.

त्यापैकी काहींचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील पाच अहवाल डेंग्यूचे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. पुढील काळात डेंग्यूचे रूग्ण वाढण्याची शक्यताही वैद्यकीय व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!