Monday, October 25, 2021

पत्रकारांनी राणेंचं नाव घेतलं आणि राज ठाकरे म्हणाले, ऐ चल बस्स…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. त्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, ए चल बस्स… असं म्हणत राज ठाकरे यांनी राणेंच्या यात्रेवर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. पत्रकार परिषद संपत आली असताना एका पत्रकाराने त्यांना नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेबाबत सवाल केला. तेव्हा, ऐ चल बस्स… असं म्हणत राज यांनी या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी चुकीचा इतिहास लिहिला म्हणता, पण सिद्ध करा ना… 50 साली पहिलं पुस्तक आलं. त्यावेळी तुम्हाला चुकीचा इतिहास कळला नाही का? ज्याचं काही आकलन नाही, त्याच्यावर काय बोलायचं? कोण जेम्स लेन? कुठे आहे सध्या? आग लावायला आला, त्याच वेळी का आला? हे सर्व वेल डिझाईन्ड आहे, अशी टीका त्यांनी केली.

मी बाबासाहेब पुरंदरेंना भेटतो. ते शिवशाहीर म्हणून भेटतो. ब्राह्मण म्हणून भेटत नाही. शरद पवारांना भेटतो तेव्हा मराठा म्हणून भेटत नाही. तुम्हाला भेटतो तेव्हा तुमची जात पाहून भेटत नाही. आपण यातून बाहेर पडलं पाहिजे, असं सांगतानाच मी काय वाचतो आणि काय वाचलं पाहिजे हे मी आणि माझ्या पक्षाला माहीत आहे. मला कुणी मोजण्याचं काम करू नका, असं त्यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदी हे विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान झाले. जात-धर्माच्या आधारे नाही. लोक विकासाच्या मुद्द्यावरही मतदान करतात हे दिसलं. पण मी मुलाखतीत एका मुद्द्याच्या अनुषंगाने बोललो. आता काय चाललंय तर जातीचं वातावरण तयार करण्यात येतंय. मी शरद पवारांची मुलाखत घेतली होती.

त्यावर पत्रकार म्हणाले, राज ठाकरेंनी भूमिका बदलली. पण त्याचा काय संबंध? मी त्यांच्या वाढदिवसाला भाषण केलं होतं. त्याची सुरुवात होती. आजचा दिवस पाहता काही गोष्टी या राखूनच ठेवल्या पाहिजेत. वाढदिवशी आपण चांगलं बोलतो. मग म्हणजे काय भूमिका बदलली का?, असा सवाल त्यांनी केला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!