Monday, October 25, 2021

भाजपची अवस्था म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या मुद्द्यावरुन आता शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. पाहूयात काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात.पिंपरी-चिंचवड मनपाच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या एजंटला लाच स्वीकारताना पकडले याला भाजपवाल्यांनी षडयंत्र म्हणणे म्हणजे भ्रष्टाचाराची व्याख्याच बदलण्यासारखे आहे.

असे पैसे इतरांनी स्वीकारले तर तो भ्रष्टाचार आणि स्वत: पोलिसांच्या बेड्यांत अडकले तर तो षडयंत्राचा प्रकार. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस भ्रष्टाचाराचा अजगरी विळखा पडला आहे तो सोडवावाच लागेल.सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटलं आहे, भारतीय जनता पक्षाची अवस्था म्हणजे सध्या मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशा प्रकारची झाली आहे.

या पक्षाला मिळेल त्या मार्गाने पैसे कमविण्याचे म्हणजे भ्रष्टाचाराचे वावडे कधीच नव्हते. हेच लोक सध्या उठसूट मुंबई मनपावर निशाणा साधत असतात पण स्वत:च्या खुर्चीखाली काय जळते आहे त्याचा मात्र त्यांना सोयिस्कर विसर पडतो.

एखाद्या शहराची पुरती इज्जत काढणे म्हणजे काय? ते कालपरवा पिंपरी-चिंचवड मनपात घडले. या मनपावर सध्या भाजपचा झेंडा आहे.घाऊक पक्षांतरे घडवून पिंपरी चिंचवडची मनपा भाजपने जिंकली. त्यामुळे तिजोरीच्या चाव्या या जुन्याच मालदार, वतनदारांकडे राहिल्या.

एकेकाळी आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणून पिंपरी-चिंचवड नगरपालिकेचे नाव घेतले जात होते.जशी श्रीमंतीची चर्चा तसा येथील भ्रष्टाचाराचाही बोलबाला झाला. विकास कामांच्या नावाखाली गेल्या काही वर्षांत ठेकेदारांनी महानगरपालिकेची लूट केली आहे.

पण या भ्रष्टाचारावर कुणी बोलायचे नाही कारण येथे भाजपचा पारदर्शक वगैरे कारभार सुरू आहे असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!