Monday, October 18, 2021

नगर ब्रेकींग: मद्यधुंद तरुणाचा प्रांताधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरून उडी ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महसूल अधिकार्‍यांकडे वेळोवेळी विनवणी करूनही जमिनीचा वाद निकाली निघत नसल्याने संतापलेल्या मद्यधुंद तरूणांने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयाच्या गच्चीवर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न केला.

शहर पोलिसांनी त्याला वेळीच पकडल्याने त्याचा आत्महत्येचा प्रयत्न फसला. ही घटना काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.सचिन माणिक गोर्डे (वय 24) रा. धांदरफळ, ता. संगमनेर असे या तरुणाचे नाव आहे. काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तो मद्यप्राशन करून

शहरातील नवीन नगर रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील इमारतीच्या गच्चीवर चढला. मध्याच्या धुंदीत अधिकार्‍यांना शिवीगाळ करत त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला वेळेस अडविल्याने तो उडी मारू शकला नाही.

एका पोलीस अधिकार्‍याने त्याला शहर पोलीस ठाण्यात नेले. त्याची बाजू समजून घेऊन रात्री त्याला त्याच्या घरी सोडून देण्यात आले. या युवकाचा शेतजमिनीचा वाद आहे. याबाबत त्याने प्रांताधिकारी, तहसीलदार यांना वेळोवेळी पत्र दिले होते. मात्र याबाबत कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या

 या तरुणाने रात्री साडेआठ वाजता प्रांताधिकारी कार्यालयाच्या गच्चीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला.दरम्यान या युवकाने रात्री उशिरा प्रांताधिकारी कार्यालयावर जाऊन उडी घेण्याचा प्रयत्न केल्याने या ठिकाणी नियुक्तीस असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला का अडविले नाही असा सवाल उपस्थित झाला आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!