Tuesday, January 18, 2022

श्रीरामपूर-नेवासा-शेवगाव रस्त्या खड्डेमुक्तीसाठी प्रहारचा आंदोलनाचा इशारा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

श्रीरामपूर-नेवासा-शेवगाव महामार्गावर खड्डेच खड्डे झाले असून हा रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठीं ऑगस्ट अखेर पर्यंत रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागात प्रहार स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी दिला आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या नेतृत्वात जिल्हा संघटक महादेव आव्हाड, प्रहार धरणग्रस्त कृती समिती अध्यक्ष कृष्णा सातपुते, नेवासा तालुका सरचिटणीस जालिंदर आरगडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले.

या निवेदनात निवेदनामध्ये श्रीरामपुर-नेवासा-शेवगाव महामार्गावर खड्डे पडून रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्या पूर्णपणे खराब झाल्या आहेत. हा रस्ता असाच पुढे शेवगावपर्यंत पूर्णपणे खराब झालेला आहे. याच रस्त्याने इतर वाहतूकी सोबत मोठ्या प्रमाणात सात ते आठ साखर कारखान्याचे ऊस वाहतूक सुरूअसते.त्या काळात अपघाताचे प्रमाण वाढत असते.
नेवासा तालुक्यातील सलाबतपुर ते भेंडा हा रस्ता अद्याप अपूर्णच आहे. सलाबतपूर ते गोंडेगाव चौफुली पर्यंतचा रस्ता नवीन करण्यात आला पण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झालेले असल्याने त्याला लगेचच खड्डे पडले आहेत. पुढील रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे.
मुकुंदपुर ते गेवराई हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे.
गोगलगाव ते जळके हा पाच किलोमीटरचा रस्ता पूर्ण पणे खराब झाला असून या रस्त्याच्या नवीन कामाला मंजुरी देऊन तात्काळ नवीन रस्त्याचे काम चालू करण्यात यावे.
सलाबतपूर ते दिघी हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे या रस्त्याचा नवीन कामालाही मंजुरी देण्यात यावी.
प्रवरा संगम ते मंगळापुर या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे या रस्त्याच्या नवीन कामाला परवानगी देऊन काम सुरू करण्यात यावे.
लोहगाव ते चिंचोरा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून या रस्त्याच्या नवीन कामाला मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात यावी.
या सर्व रस्त्यांपैकी काही रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने जागृत नागरिकांनी काम बंद पाडल्याचे समजते तर काही ठिकाणी रस्ते नवीन होऊनही त्याला लगेचच खड्डे पडलेले आहे संबंधित कंत्राटदाराने खड्डे बुजवले पण ते पुन्हा पडले आहे यातून कामाचा दर्जा आणि संबंधित अधिकाऱ्यांची मिलीभगत समोर येत आहे. वरील सर्व कामाची आपण चौकशी करावी व संबंधित अधिकारी कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

नेवासा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व कामांचा तपशील अहवाल जिल्हाध्यक्ष पोटे यांनी मागितला आहे. नवीन रस्त्यांच्या कामांना मंजुरी व इतर रस्त्यांना खड्डे पट्ट्या दुरुस्तीची कामे तात्काळ सुरू करावीत सर्व कामांचा तपशील लवकरात लवकर प्रहार ला देण्यात यावा जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी इशारा देत ऑगस्ट अखेर पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन केले जाईल सर्वस्वी जबाबदारी म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभागाची व प्रशासनाची राहील असे निवेदन देऊन सांगितले.

 

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!