Tuesday, January 18, 2022

आनंदाची बातमी:मुळा धरण भरले इतके टक्के

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात शनिवारी दमदार पावसाच्या आगमनाने १६ ऑगस्टपासून सुरू झालेले मघा नक्षत्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने दिलासादायक ठरले आहे. घाटमाथ्यावर पाऊस मंदावला असल्याने मुळा धरणात येणारी पाण्याची आवक कमी आहे.

मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी झालेल्या पावसामुळे आज १२ तासात धरणात ९३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा वाढला आहे. शनिवारी दुपारी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाचे आगमन झाले. सायंकाळी उशिरापर्यंत राहुरीत रिमझिम पाऊस सुरूच होता.

शुक्रवारच्या पावसाची राहुरी ४ मिलीमीटर, कोतुळ १४ मिलीमीटर, मुळानगर ८१ मिलीमीटर नोंद झाली. शनिवारी सायंकाळी ६ वाजता पाणलोट क्षेत्रातील कोतूळकडून मुळा धरणात १२०१ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. सायंकाळपर्यंत धरणाचा पाणीसाठा १८ हजार ५०२ दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ७१ टक्के भरले आहे.

मागील वर्षी आजच्या दिवशी सायंकाळपर्यंत धरणाचा पाणीसाठा २० हजार ८९६ दशलक्ष घनफूट होऊन धरण ८० टक्के भरले होते. तर घाटमाथ्यावर पाऊस टिकून आहे. मागील वर्षीच्या तुलनेत शनिवारी सायंकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा २ हजार ४०० दशलक्ष घनफूटाने कमी भरला आहे.

शनिवारी सायंकाळी ६ वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा १८ हजार ५०२ दशलक्ष घनफूट आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!