Tuesday, January 18, 2022

निलेश लंकेंचं कौतुक:कुत्रे भुंकत असतात, हत्ती थाटात चालतो

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी लंके यांचे तोंड भरून कौतुक केलंय.’कितीही कुत्री भुंकली तरी हत्ती चालत राहतो.

तुम्ही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत चला असा सल्लाही इंदोरीकर यांनी दिला.आमदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून भाळवनी येथे शरद पवार यांच्या नावाने कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. सध्या तिथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये कीर्तन करण्यासाठी इंदोरीकर महाराज यांना आमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी कीर्तनातून समाज प्रबोधन करतानाचा इंदोरीकर यांनी लंके यांच्या कामाचे कौतुक केले. ‘या कोविड सेंटरमधून बरा झालेला प्रत्येक रुग्ण आणि त्याचे नातेवाईक लंके यांना आशीर्वाद देत आहे’ असं ही महाराज आपल्या कीर्तनात म्हणाले.

‘हत्ती चालत असताना कुत्री भूंकत असतात, पण हत्ती थाटात चालत असतो. हत्तीचं काम कसं असतं हे लंके यांच्याकडून शिकलं पाहिजे. हत्ती गावात आला असेल हे ओळखायचं असेल ना,  कुत्री भुंकली पाहिजे, कुत्री भूंकली नाही तर हा अपमान आहे, हत्तीने फक्त डोलात चाललं पाहिजे, त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही पाहिजे, असंही इंदोरीकर महाराज म्हणाले.

 

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!